एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 9)
रावासाहेब, भोज व भगताकडे दिलेल्या भगीनी म्हणजे रावसाहेबांचे घर. ते घर म्हणजे एक वेगळी ठेवण होती. घरात अनेक दु:खाचे डोंगर आले पण आपल्या सदस्यांना त्यांनी खंबीर धीर दिला. त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भोज व भगत या बहिणी व त्यांचे सर्व कुटूंब आपल्या घरात ठेवले. त्यांना व्यवसायत सामील केले. त्यांना व्यवसाय शिकवुन दिशा दिली. इतके मोठं कुटूंब गोकुळा सारखे संभाळणे ते ही मोठा व्यवसाय संभाळुन करणे महाकठीण. पण रावसाहेबांनी साध्य ही केले. यांची नोंद जरूर ठेवली पाहिजे. त्यांनी सर्वांना आपले मानून यशस्वीतेचे धडे दिले.