एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 11)
स्वतंत्र्याच्या चळवळीत पुणे हे केंद्र होते. पुणे लष्कर परिसरात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. रावसाहेब हे व्यवसायाने उघड भाग घेत नसत पण त्यांचा पडद्या मागून हात आसे. यशवंतराव चव्हाण, अमीर खाँ., काकासाहेब गाडगीळ, तात्यसाहेब केळकर, करंदीकर या मंडळींचा संबंध असे भुमीगतांना ते सुरक्षित ठेवत. चळवळीला आर्थिक मदत देत असत. भुमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या अडचनीतल्या कुटूंबीयांना मदत गुपचुप पाठवत आसत 1920 मध्ये खिलाफत चळवळीच्या वेळेस शौकत अली मान हे पुण्यात आले त्या वेळी जी स्वागत कमिटी होती त्यात हे महत्वाचे सभासद होते. स्वतंत्रता च्या चडवाडीत कँटोन्मेंट भागात पहिले गणपती बसवले ते लोकमान्य टिळक च्या उपस्थितीत व रावसाहेब पन्हाळे ह्यांचा हस्ते .
राजकारणात उतरले नाहीत पण केशवराव भगत यांच्या मुळे टिळक, आगरकर, केळकर यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान आले होते. ते स्वागत कमीटीवर होते. लष्कर भागातील काँग्रेस कमीटीचे खजीनदार ही होते. एक दानशुर, प्रसिद्ध व्यापारी यामुळे महाराष्ट्रातील मंत्री पुण्यात येत तेंव्हा त्यांना रावसाहेब पन्हाळे आठवत. एवढी जाणीव मुख्यमंत्री व मंत्रीमंडळास होती.