एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 12)
रावसाहेबानी आपली समाज सेवा चालू ठेवली. आज जेव्हा मराठा ह्यांना आरक्षण मिळविण्यासाठी इतकी वर्ष व त्याग द्याला लागला तिथे तेली समाजाने एकाच व्यक्तीचे आभार मानायला हवे ते म्हणजे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ह्यांचे. रावसाहेबांचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्याशी घनिष्ट संबंध होते. आरक्षणाची यादी आली तेव्हा रावसाहेब समोरच बसले होते. सादर यादीत तेली समाजाचे नाव न्हवते. रावसाहेबांच्या सांगण्याने तेली समाजाचे नाव त्या यादीत समाविष्ट केले गेले.