एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 13)
ईश्वरावर अढळ श्रद्धा होती अनेक देवस्थांनाना मदत केली. खडीच्या मैदानावरील नागेश्वरावर श्रद्धा होती. दर्शन घेतल्या शिवाय जेवत नसत. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा स्वभाव होता.
रावसाहेब उदार होते. समाज साठी करताना ते आपल्या घरातील व्यक्तींसाठी तेवढेच करत होते. आज पन्हाळे कुटुंबाची ओळख त्याच्या मुळेच आहे व राहील. ‘दान हे आधी स्वतःच्या घरापासून सुरु व्हावे’ ह्या म्हणीला ते पुरेपूर उतरले. उदाहरणता 1969 ला त्यांनी थेऊर येथील शेतीचे वाटणी करताना आपल्या मुलाला, पुतण्या व चुलत सून मध्ये समान वाटप केलीच पण चुलत सून विधवा होत्या म्हणून त्याचा पुढचा विचार करून इतरांपेक्षा जास्त दिली.
त्यांचा ह्या उदारता, समाज कल्याण साठीच 1973 साली भारत सरकार द्वारा ‘पद्मश्री’ बहाल करण्यात आली होती. त्यांचा सर्व स्तरावर कौतुक व मान पात्र देउन सन्मान करण्यात आला.
पुण्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व व उद्योग जगता मधील आद्य वासाहतकार म्हणून त्याची सदैव ओळख व ख्याती राहील.