एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 15)
दादासाहेब पन्हाळे च्या मृत्यू समयी त्यांचे चिरंजीव अभिजित पन्हाळे हे तेव्हा अज्ञान होते. परंतु परिस्थीला ना डगमगता त्याने आज लिलावाच्या क्षेत्रात चांगल नाव कमविले आहे. त्यांची फर्म शंकर रामचंद्र ऑक्शनीर्स इ लिलावामध्ये देशातील नामांकित फर्म म्हणून ओडखळी जाते. त्यांनी आपल्या आजोबा अर्थात ‘रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे’ ह्यांचा नावाने एक फौंडेशन ची स्थापना केली आहे. रावसाहेबांच्या विचारधारेला अनुसरुन शिक्षण क्षेत्र, गोर गरीब, अनाथ ह्यांचा कल्याणाच्या दृष्टीने ह्याची संकल्पना आखली आहे.
तेली समाजातील एक काळ गाजवलेली ही एक महान व्यक्ती अर्थात रावसाहेब शंकर रामचन्द्र पन्हाळे त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
- संकलन मोहन देशमाने
संदर्भ - रावसाहेब पन्हाळे, चरित्र ग्रंथ 1960 चे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते 8 जानेवारी 1960 रोजी प्रसिद्ध.
लेखक - हरिश्चंद्र गोविंद मेरूकर