( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
राऊत पालखीकडे आले. त्यांचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून सर्वांनी विचारले. सर्वांना जे झाले ते कथन केले. सर्वजन नाराज झाले. पण दुसर्याच क्षणाला पालखी पंढरपुरला नेणारच या निश्चयाला चिकटपट्टीसारखे चिकटून बसले.

राऊत, दादा भगत, शरद देशमाने, बाळासोा. पिंगळे, टेकवडे यांची खंबीर भुमिका हीच या सोहळ्याची शिदोरी होती. पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले. वाटेवर हैबत बाबाच्या मालिकेतील अभंग म्हणत पालखी नीरेकर मंडळी हजर होती. ही मंडळी आमच्यात सामील झाली. महाराजांना हार घातला पूजा केली व अभंगाच्या नामात विलीन झाले. नीरा हे पुणे जिल्ह्यातले शेवटचे टोक इथ दहा - बारा समाजबांधव तसे सर्वांचे सहकार्य मोलाचे शंकरराव पवार, एकनाथ पवार, अप्पा पवार या मडंळींनी उत्तम व्यवस्था ठेवली.
नीर नदी ओलांडून पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद या गावाकडे निघाली. लोणंदला दोन दिवस मुक्काम होता. या मुक्कामात आजूबाजूच्या पंधरा वीस मैलांच्या परिसरातील अनेक बांधव दर्शनास आले. जाताना यथाशक्ती देणगीही दिली. येथील बांधवांनी चांगली व्यवस्था ठेवली. पालखी तरडगाव वगैरे करीत फलटण मुक्कामी आली. प्रा. अरविंद राऊत व विकास राऊत या धडपड्या युवकांनी फलटणमध्ये विखुरलेला समाज एकत्र केला. त्यांचे सहकार्य घेऊन पालखीची समयोजित सहकार्य केले. सर्वांची जेवणाची व मुक्कामाची सोय केली.
फलटण - बरड, बरडचे अर्जुनशेठ बरडकर, विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते माणुस फार मोठ्या दिलाचा शून्यातून उभा राहिला. शून्यातून विश्व निर्माण केले. फलटण - पंढरपूर रत्यावरचे हे छोटेच पण टुमदार गाव. या गावाला - भागाला राजा शोभावा असे डोळ्यात न मावणारे वैभव. या वाटेवरच कोणाही वारकरी व वाटसरू दारात उभा रहावा. घरातले शिजलेेले ताजे अन्न त्याच्या ताटात वाढणार. जेवणाची वेळ असेल तर आपल्या पंगतीला त्यांना घेणार. हा रोजचा नियम जो दारात आला तो रिकाम्या हाती गेला नाही. पाहिजे हा नियम. या नियमाला कोणी अपवाद झाला तर बरडकर अण्णा त्याला दया करीत नसत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade