अकोला, ता. ८ : तुकोबाजी गाथा ज्यांनी घराघरात पोहोचवली असे तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.८) शहरतील पंच बंगला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संताजी सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत समस्त समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी संताजी महाराजांचा नागरिकांच्यावतीने जयघोष करण्यात आला. मिरवणुकीला सुरुवात दुपारी १२ वाजता राठोड पंच बंगला शिवाजी नगर येथून झाली. प्रारंभी संत श्री संताजी महाराज यांच्या रथाचे पूजन करण्यात आले. श्री राजराजेश्वर मंदिर, जय हिंद चौक, सिटी कोतवाली चौक, महात्मा गांधी रोड मागनि ही मिरवणूक गेली. खुले नाटा गृह येथे महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत तेली समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे आकर्षक देखावे, उंट, घोडे, संताजी महाराजांचा भव्य रथ व महाराष्ट्राच्या थोर समाजसुधारकांचे विचार मांडणारे देखावे तसेच समाज प्रबोधन पर देखावे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.
मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी संताजी सेनेजे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, उपजिल्हाप्रमुख मनोज जुमळे, विधीआघाडी प्रमुख अँड.देवाशिष काकड, गणेश पोलाखडे, जिल्हासंघटक विश्वनाथ भागवत, सदस्य प्रविण झापर्डे, कैलास दळवी, जितेंद्र सोनटक्के, पंजाव भागवत, बाळू भागवत, दिनेश भोंबळे, बालमुकुंदजी भिरड, गोपाल राऊत, प्रकाश डवले, अरविंद देठे, अतुल राठोड यांच्यासह अन्य समाजबांधवांनी परीश्रम घेतले.