जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथे चे लेखक संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात भांडुप- मुलुंडमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करावी असा अध्यादेश काढला होता. त्यानुसार पहिल्यांदाच आम्ही तेली प्रतिष्ठान भांडुप यांच्यातर्फे संताजी महाराज यांची जयंती भांडुपच्या एस बॉर्ड, टी वॉर्ड व तहसील कार्यालयात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात ह. भ. प. नामदेव महाराज यांच्या प्रवाचनाने झाली.
याप्रसंगी, भाजपचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, साह तेली समाजाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा मालती जगनाडे, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष वामन भागवत, अमोल साळुखे, संतोष रहाटे, चंद्रशेखर रहाटे, आम्ही तेली प्रतिष्ठान चे पदाधिकरी व तेली समाजाचे सर्व कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade