चामोर्शी - जनसंख्येने मोठ्या प्रमाणात असलेला तेली समाज आजही सरकारच्या उदासीन धोरणामुळे अन्यायाने पिचला जात आहे. किंबहूना जेव्हा-जेव्हा ओबीसींचा विचार आला तेव्हा ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाचा कणा असलेला तेली समाजबांधव व कुणबी यांचे अत्यंत हाल होत असून या बहुसंख्य समाजाला जनगणनेमध्ये स्थान नसावे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याने आतातरी संताजी जगनाडे महाराजांना स्मरून तेली समाजबांधवांनो आपल्या हक्कासाठी पेटून उठा, असे आवाहन 'शेतीचे अर्थकारण, सरकारी धोरण व तेली समाजाचे आरक्षण' याविषयवार बोलताना यवतमाळ येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रवीणदादा देशमुख यांनी केले.
संताजी स्नेही मंडळ तालुका चामोर्शीच्यावतीने संतशिरोपणी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज 'समाजप्रबोधन व किर्तन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास निंबोरकर यांनी संताजी शिकवण व स्त्रीचे शिक्षण समाज उन्नतीसाठी किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.
समाजप्रबोधन व किर्तन कार्यक्रमापूर्वी संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची सुरुवात बॉईक रॅली व पायी पालखीचे आयोजन शहरातून वाळवंटी चौक, चांभारपूरा, संताजीनगर, मार्कंडापुरा, माता मंदिर, गव्हारपुरा, मुख्य बाजारपेठ व कार्यक्रमस्थळी येऊन समारोप करण्यात आला.
संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाच्या आरंभी जयलक्ष्मी महिला व पुरुष भजन मंडळ यांच्यावतीने सुगम संगीताचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमादरम्यान वर्ग १०, १२ वीतील गुणवंत विद्यार्थी प्राची बारसागडे, स्नेहल दुधबावरे, वर्ग १२ वीचे आशिक कुनघाडकर, आचल कुकडे, धनश्री खोब्रागडे, श्रेयस धोडरे तसेच विविध क्षेत्रातील तेली समाजाचे नावलौकिक करणारे शेतकरी गणपती सातपुते, दिवाकर शेट्टे, रेखा बुरांडे, प्रवीण नैताम, केतन बारसागडे, रवींद्र नैताम, वृषभ भांडेकर यांचा शाल, श्रीफळ व संताजीची प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, द्वारकाप्रसाद सातपुते, ठिवरू बारसागडे, नानाजी बुरांडे, गोसाई सातपुते, राहूल नैताम, प्रा. राम वासेकर, विनोद खोबे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, रमेश नैताम, निशांत नैताम, धनंजय कोठारे, कृष्णाजी नैताम, विकास दुधबावरे, किशोर बुरे, सुभाष कोठारे, लिलाधर सुरजागडे, दिलीप सोमनकर, भाग्यवान पिपरे, कुमोद सोमनकर, सुनील दुधबळे, मंगेश वासेकर, सिमा खोबे, श्वेता पिपरे, कविता किरमे, पुष्पा कोठारे, वैशाली भांडेकर, संध्या जुवारे, कविता बारसागडे, अर्चना बारसागडे, निलिमा कोठारे, चंचल गव्हारे उपस्थित होते. संचालन प्रा. राम वासेकर, प्रास्ताविक राहुल नैताम व आभार क्रिष्णा नैताम यांनी मानले.