राहुरी तेली समाज : संत जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती राहुरी येथील तुळजामाता पालखी मंदिरात साजरी करण्यात आली. राहुरीचे तहसीलदार एफ. आय. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती अरूण तनपुरे, राहुरी नगर परिषदेच्यावतीने उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. राहुरी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी गोविंद खामकर, गटशिक्षण आधिकारी सुलोचना पुरनाळे यांनी हार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमास आसाराम शेजुळ, दत्तात्रय सोनवणे, संजय पन्हाळे, कैलास शेजुळ, गोकुळ महाराज शेजुळ, गंगाधर शेजुळ, किशोर इंगळे, सुरेश धोत्रे, बाळासाहेब शेजुळ, विजय करपे, राजुभाऊ इंगळे, शरद इंगळे, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade