( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
माऊलीबरोबर जाणार्या लाखो माणसांचा समुद्र. त्यांना पोटभर जेवण देण्याचे काम हे अर्जुनशेठ करीत. हा लैकिक अनेक वर्षांचा. पालखी निघणार ही गोष्ट दादा भगतांच्या करवी समजली होती. पालखी मावळातून आणण्यास त्यांनीच टेम्पो दिला होता. आणि कार्यकर्त्यांना आशीर्वादही. पालखी बरडला येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर मावत नव्हता शिवेवर पालखी आली. अर्जुनशेठ सामोरे आले. दर्शन घेतले, हार वगैरे घातला. अभंगाच्या गजरात देहभान हरपून संताजी महाराजांना गावात घेऊन आले. साखरे महाराजांचा प्रसंग कानावर घातला. मी सांगतो म्हणाले. या माणसाच्या साध्या शब्दालाही किंमत होती.