वाशिम तेली समाज मुंगळा, ता. ९ : संताजी महाराजांना कीर्तन, प्रवचन श्रावणानाच्या आवडीमुळे संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट १६४० साली झाली. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजान गुरुस्थानी मानले होते. तुकाराम महाराजांची गाथा
आज संताजी महाराजांच्या परिश्रमामुळे जिवंत आहे, असे प्रतिपादन रुपाली वाघ यांनी केले. श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री हनुमान मंदिर सभागृहात संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व हार अर्पण करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना रुपाली वाघ म्हणाल्या की, तुकाराम महाराजांचे नवीन नवीन अभंग ते आपल्या वहीत लिहून ठेवत असत. हजारो अभंग त्यांनी संग्रहित करून ठेवले आहेत आणि त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साठा आज आपल्याला मिळत आहे. या कार्यक्रमाला सखाराम वनस्कर, नारायणडोंबळे,बबन क्षिरसागर. अंबादास दळवी, अरूण पाठक, संजय क्षिरसागर, वामन वाघ, संतोष वनस्कर, सुखराम क्षीरसागर, गजानन हमाणे, संजय दळवी, मुरलीधर वनस्कर, रामकृष्ण वनस्कर, गजानन डोंबळे, विजय डोंबळे, अहिल्या डोंबळे, पार्वती वाघ, शिला वाघ, कल्पना हमाणे, रेखा डोंबळे, सुमन वनस्कर, ज्योती डोंबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मनोज वनस्कर, पुरुषोत्तम डोंबळे, अजय वाघ, अभिजित हमाणे, नंदकिशोर वनस्कर, अनिकेत डोंबळे, शुभम डोंबळे, वैभव क्षिरसागर, अनिकेत दळवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती.