तेली समाज बुलढाणा डोणगाव : 8 डिसेंबर ग्रामपंचायत व सर्व शाळांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य डोणगाव येथील जिप कन्या शाळा, जिप मराठी प्राथमिक शाळा . शिवाजी हायस्कूल, मावा, पातरकर आणि ग्राम पंचायत येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकांपैकी एक आणि ज्यांना तुकाराम महाराज यांचे संपूर्ण अभंग मुखोद्गत होते तसेच तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदी मध्ये बुडविल्यानंतर ज्यांनी संपूर्ण अभंग पुन्हा लिहन काढण्याचे काम केले ते म्हणजे संत संतू जगनाडे महाराज होत.
त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमासाठी विनोद बोडगे, रामभाऊ महापुरे, मोहन इंगळे, आणि गावातील समस्त तेली बांधवांनी सहभाग घेतला.
डोणगाव येथून जवळच असलेले आदर्श गाव पांगारखेड येथे संत जगनाडे महाराज जयंती निमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात शेकडो रक्तदात्यांनी येथे रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला रक्दात्यांचा सहभाग हा वाखाणण्या सारखा होता, कार्यक्रमासाठी जिप सदस्य राजू पळसकर आणि डॉ. उळमळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सरपंच गंगा नालिंदे, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच व गावातील समस्त तेली बांधवांनी सहकार्य केले.