किन्हीराजा. दि. 8 तेली समाजबांधवाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
यावर्षी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय निमशासकिय कार्यालयात इतर महापुरुषाच्या जयंती प्रमाणे ही जयंती सुध्दा साजरी करावी असे आदेश शासनाने प्रथमच सर्व शासकिय तसेच निमशासकिय कार्यालयांना दिले. या आदेशान्वये येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नालींंदे याचे हस्ते संत जगनाडे व संत तुकाराम महाराजजांच्या प्रतिमेचे पूजन करुन हाराअर्पण करण्यात आला यावेळी गजानन इंगळे गुरुजी यांनी संत जगनाडे महाराज व संत तुकाराम महाराज याच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या संतांनी समाजातील वंचित पिडीत बहुजनांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला विविध राजकिय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक संघटनेने कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंगळा येथील तेली समाजबांधवांच्या वतीने श्री हनुमान मंदिर सभागृहात संत श्रेठ जगनाडे महाराजांची जयंती ८ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सखाराम वनस्कर, नारायण डोंबळे, बबन क्षिरसागर, अंबादास दळवी, अरुण पाठक, संजय बिरसागर, वामन बाप, संतोष वनस्कर, सुखराम क्षीरसागर, गजानन हमाणे, संजय दळवी, मुरलीधर वनस्कर, रामकृष्ण वनस्कर, गजानन डोंबळे, विजा डोंबळे, रूपाली वाघ, अहिल्या डोंबळे, पार्वती वाघ, शिला वाघ, कल्पना हमाणे, रेखा डोंंबळे, सुमन वनस्कर, ज्योती डोंबळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वनस्कर यांनी जगनाडे महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. वनस्कर म्हणाले की, जगतगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा आज संताजी महाराजांच्या अथक परिश्रमामुळे जिवंत राहू शकले, तुकाराम महाराजांचे नवीन नवीन अभंग ते आपल्या वहीत लिहून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांनी हजारो अभंग संग्रहित करून ठेवले आहेत. संत संताजी महाराजामुळेच जगतगुरु तुकाराम महाराजांचा अनमोल साठा आज आपल्याला मिळत असल्याचे श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्था मुंगळाचे अध्यक्षा नंदकिशोर वनस्कर यांनी सांगीतले. या कार्यक्रमाला प्रारंभी ग्रामपंचायत सदस्या सौ.साधना डोबळे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज वनस्कर, पुरुषोत्तम डोंबळे, अजय वाघ, अभिजित हमाणे, अनिकेत डोंबळे, शुभम डोबळे, वैभव क्षिरसागर, अनिकेत दळवी
संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती.