चंद्रपूर दि. ०८ : सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. ज. पु. ति. २२१८/ प्र. क्र. १९५//२९ दि.२६ डिसेंबर २०१८ परिपत्र काढण्यात आले आहे. त्यानुसार संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी म्हणुन आज श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा फोटो भेट देऊन शासकीय परिपत्रकाची प्रत व निवेदन दिले.
सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी / युवा आघाडी/ यलगार युवा / महिला संघटना संयुक्त विद्यमानाने करण्यात आला. पोलिस आयुक्त कार्यालय, तहसीलदार कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालय, पोलिस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, आदी ठिकाणी देण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,महिला आघाडी,चंद्रपूर शहर अध्यक्ष, सौ. छबुताई वैरागडे, तैलिक महिला कार्यकारणी सदस्य/युवा यलगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, जितेंद्र इटनकर,शैलेश जुमडे, खेमराज हिवसे, सौ.कविता जुमडे, उपाध्यक्ष पूजा पडोळे, सचिव,वंदना येरणे, कोषध्यक्ष सुवर्णा लोखंडे, वैशाली कांमडे, बाली ताई, गोलू तेलमासरे, दिनेश जुमडे,संगीता कुर्जेकर, नगरसेविका, कल्पना बाबुलकर, उजवला येरणे, रवि लोणकर,चन्ने भाऊ, माधुरी बावणे,आदी मान्यवर उपस्थित होते.