मालेगाव : महानगर तेली समाज व श्री संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुणे आमदार दादा भुसे यांच्या हस्ते आरती व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तेलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय कार्यालय शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक पाटील यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संताजी महाराजांनी तुकारामांची गाथा लेखणीबद्ध करून अमर केली. याप्रसंगी रमेश उचित, गोविंद करपे, आबा बागुल, रवि चौधरी, दगा चौधरी, रमेश चौधरी, दता जाधव, आनंदा महाले, भगवान बागुल, राजेंद्र बागुल, पोपट चौधरी, गोकुळ चौधरी, संजय चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राजेंद्र चौधरी, मधुकर गायकवाड, मोहन पवार, डॉ. अनुदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade