नाशिक तेली समाज : संताजी महाराज जगनाडे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सरकारने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने याबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. यानिमित्ताने प्रतिमापूजन, मिरवणुकांसह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
चांदवडला प्रतिमा भेट चांदवड : केंद्र सरकारच्या आदेशान्वये दि.८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याचा जी. आर. काढला तसेच त्या अनुषंगाने चांदवड येथील तिळवण तेली पंच ट्रस्ट व सर्व समाज बांधवांच्या वतीने चांदवड शहरातील सर्व शासकीय, कार्यालये, पंचायत समिती ऑफिस, नगर परिषद कार्यालय व शाळा कॉलेजमध्ये श्री संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट दिली.
यावेळी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्धं भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांना प्रतिमा दिली. याप्रसंगी तिळवण तेली पंच ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती व्यवहारे, उपाध्यक्ष सचिन खैरनार, नगरसेवक जगन्नाथ राऊत, संचालक दीपक व्यवहारे, रमेश जाधव, अॅड. किशोर व्यवहारे, सूर्यकांत ठाकरे, गणेश वाघ, संतोष सोनवणे, पवार, लक्ष्मण लुटे, रामदास शिरसाठ, पांडुरंग विरार, दत्तात्रय राऊत, चंद्रकांत व्यवहारे, भिकचंद व्यवहारे, अदीनारायण जाधव, दत्तात्रय साळके, पिंटू राऊत, विनोद सोनवणे, गोपाळ बाघ, पंकज राऊत, गणेश जाधव, प्रकाश सोनवणे व समाजबांधव उपस्थित होते.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथील संताजी मित्रमंडळाने ब तेली समाज बांधवांनी गावातील तरुणांनी रविवारी (दि.८) सकाळी अकरा वाजता गावातील शनि मंदिरात एकत्र येऊन राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे, उपसरपंच. रामचंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते नंदू जाधव, राम शिंदे यांच्या हस्ते संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वानुमते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी संत जगनाडे महाराजांची इतिहासातील संपूर्ण माहिती आपल्या मनोगतातून या कार्यक्रमप्रसंगी सांगितली. या कार्यक्रमाचे गावातील रतन नाना बांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी गणेश दुर्गुडे, विश्वंभर कदम, सुनील महाले, राहुल पाबळकर, चेतन महाले, शैलेश कदम, अक्षय गायकवाड, दिनेश कदम, भूषण महाले, सौरभ कदम, प्रसाद कदम, दिनेश कदम, दत्तात्रय कदम,प्रसाद पाबळकर, रोहित पायळकर, रोहित कदम, यश कदम, ओमकार महाले, हरिओम पाबळकर, आकाश दवंडे, योगेश बांबळे आदींसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.