माणूस कर्मानेच मोठा होत असतो. कुणी स्वतःसाठी कर्म करतो. तर कुणी जगासाठी झिजतो. समाजासाठी झिजणे हेच खरे जगणे होय, असे मत ह. म. प. नागोराव भडदमकर महाराज यांनी आज यथे व्यक्त केले.
एस. एम.सी. शाळेच्या सभागृहात तेली समाज मंडळाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मडदमकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ समाजबांधव प्रा. हरिभाऊ क्षिरसागर अध्यक्षस्थानी होते. समाज मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बंटी वाघमारे, माजी अध्यक्ष भगाजी घुले, नारायणराव डाखोरे, रंगनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. भडदमकर महाराज पुढे म्हणालं, की आज गीता जयंती आणि संताजी महाराज जयंती एकत्र आली आहे. हा मोठा योग आहे. भगवान कृष्णानेही गीतेतून निष्काम कर्मयोग सांगितला आहे. आपण समाजासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. समाज मंडळ अध्यक्ष रुपेश वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त करून प्रगतिपथावर असलेल्या कामांबाबत तेली समाज बांधवांना अवगत केले. रवींद्र बाढणकर, संजय डवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी गीता आणि गोमाता यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून भविष्यात समाज मंडळाच्या माध्यमातून विधायक कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. श्रीराम गांजरे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष गांजरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज डाखोरे, चंद्रशेखर सुरडकर, अतुल गांजरे, बंडु गांजरे, अमोल पोधाडे, गजानन सुडके यांच्यासह तेली समाज बांधव उपस्थित होते.
डवरे करणार पाच मुलांची मोफत निवास व्यवस्था.
समाजातील गरजवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसते. अशा पाच गरीब विद्यार्थ्यांची मोफत निवास व्यवस्था करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संजय टवरे यांनी दिली.