अर्धापूर तालुका तेली समाज - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन तरूणांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालवून भविष्यातील आवाहने पेलविण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अॅड. किशोर देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र तैलिक युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत गटनेते अॅड. किशोर देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते विराज देशमुख, प्रा. डॉ. रघुनाथ शेट्टे, अॅड. अमोल देशमुख, डॉ. राहून लंगडे, उद्धव सरोदे, सचिन काळे, नगरसेवक शिवराज जाधव, सचिव सखाराम क्षीरसागर, रामराव भालेराव, गुणवंत विरकर,रमेश विरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून हार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. यावेळी अनेकांची भाषणे झाली. या कार्यक्रमास संजय वाघमारे, सुनिल शिंदे, आनंद वैद्य, शेख रफिक, शेख साजीद, प्रशांत देशमुख, राम कदम, भगवान हांडे, लक्ष्मण मुधळे, साईनाथ येवले, गोविंद पूरे यांच्या सहअनेकांची उपस्थित होती.