मुक्ताईनगर : पहिल्या आमदार निधीतुन तेली समाज मंगल कार्यालयाच्या निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार तसेच इतर मित्र आमदार यांच्याकडूनही भरीव निधी आणण्यास पुढाकार घेईल, असे आश्वासन आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते मुक्ताईनगर येथील तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून सत्कार स्वीकारतांना बोलत होते.
मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेत मुक्ताईनगरचे प्रश्न तडीस नेण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या विश्वासास सदैव बांधील राहून पिण्याच्या पाण्याची समस्या,व्यापारी संकुल,मतदार संघातील बेरोजगार तरुण जे गेल्या अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ही ते म्हणाले.
यासह प्रसंगी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचाही सत्कार करून वाढदिवस व्यासपीठावर साजरा करण्यात आला. त्यांनीही सत्कार स्विकारत सदैव समाजासाठी उभा आहे, असे सांगितले व तेली समाज मंगल कार्यालय बांधकामासाठी एक लाख एकशे अकरा रुपये देणार अशी घोषणा केली.
यावेळी नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार तेली समाजाच्यावतीने करण्यात आला, तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा सत्कार तेली समाज अध्यक्ष विठ्ठल तळेले यांनी केला.
प्रसंगी व्यासपीठावर तेली समाज माजी अध्यक्ष अशोक बोराखेडे, माजी सरपंच रमेश सापधरे, निनाजी खेवलकर, काशीनाथ मंडवाले, राजेंद्र तळेले, रमेश नारायण सापधरे, प्रकाश खेवलकर , शामराव तळेले , रमेश तळेले, कैलास दैवे, सुरेश कपले, राजेंद्र कपले, दामोदर काठोके , शिवसेना नगरसेविका सविता भलभले, माजी ग्रा.पं. सदस्य रेणुका तळेले, संगीता मनसटे, ज्योती नायसे, मनीषा खेवलकर, विजया जावरे, शालिनी गलवाडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नरेंद्र सापधरे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त तेली समाज बांधव व युवकांनी प्रचंड मेहनत घेतली.