श्रीगोंदा तेली समाज - राष्ट्र संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती श्रीगोंद्यात उत्साहात साजरी करण्यात आली. तेली समाजाच्या वतीने जगनाडे महाराज यांची प्रतिमा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना समाजाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राऊत यांच्या हस्ते भेट देण्यात आली. शनी मारुती मंदिरात देखील जयंतीचा कार्यक्रम पार पडला. येथील नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेविका वनिता क्षीरसागर यांनी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष संतोष क्षीरसागर यांनी संत जगनाडे महाराज यांचे विचार, तसेच महाराजांचे सामाजिक योगदान याबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी संजय जगताप, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, नगरसेविका सीमा गोरे, माजी नगराध्यक्षा छाया गोरे, मनीषा लांडे, दीपाली औटी, सुनीता खेतमाळीस, शाहजी खेतमाळीस, रमेश लाढाणे, संग्राम घोडके, संगीता मखरे, मनीषा वाळके, ज्योती खेडकर, संतोष कोथिंबिरे, निसार बेपारी, गणेश भोस, समीर बोरा, महावीर पटवा, राजू लोखंडे, सोनाली घोडके आदी नगरसेवकांसह कर्मचारी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade