मालेगाव : महानगर तेली सम ज, व श्री संताजी महाराज उत्सव समिती तर्फे अंबिका मंदीरात संताजी जयंती साजरी करण्यात आली.तसेच गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली.
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची ३७५ वी जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी झाली.मालेगांव कॅम्पमध्ये संताजी उत्सव समिती ने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले पुढे उंटावर बसलेले लहानसे किशोर, वारकरी भजनी मंडळ, पालखीत संताजी महाराज, मागे विशाल रथावर संताजी महाराज प्रतिमा, भगव्या साड्या नेसून नाचणाऱ्या युवती, मागे समाज बांधव अशी रचना होती.भव्य मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुणे आ. दादाभाऊ भुसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली व प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडु चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी समवेत मालेगाव महानगर तैलिक महासभा,संताजी ब्रिगेड संघटना इ.च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .तालुक्यातील विविध गावातील शासकीय कार्यालयात संताजी जयंती उत्सव साजरा झाला. मालेगावचे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांत शर्मा यांनी प्रतिमा पूजन केले व पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते वन खाते येथेही प्रतिमा पूजन झाले.तहसिल कार्यालयात तहसिलदार राजपूत यानी प्रतिमा पूजन केले. मालेगाव महानगरपालीकत उपायुक्त गोसावी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी तैलीक महासभेचे अध्यक्ष रमेश उचित यानी संताजी महाराज है संत तुकाराम महाराजाचे टाळकरी होते. तुकारामांची गाथा त्यांनी लेखणीबद्ध् करून अमर केली असे सांगुन संतांचा विधायक मार्ग अंगिकारा असे आवाहन केले.याप्रसंगी लेखाधिकारी कमरूद्दीन सहीत तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. या सर्व कार्यक्रमास राजेश बडवणे, दगा चौधरी, राजेंद्र बागुल ,रमेश चौधरी, रमेश उचित, गोविंद करपे, दत्ता जाधव, आबा बागुल, आनंदा महाले, रवि चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भगवान बागुल, पोपट चौधरी, दत्ता जाधव, गोकुळ चौधरी, संजय चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राजेंद्र चौधरी, मधुकर गायकवाड, डॉ अनुदास सुर्यवंशी, मोहन पवार इ.नी कार्यक्रमास हजेरी लावुन संंताजी महाराजांना अभिवादन केले.