महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,मुंबई व संताजी प्रतिष्ठान ह्यांच्या विशेष सहकार्याने दिनांक ८ डिसेंबर रविवार रोजी "खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम मुंबई, ठाणे, वसई पालघर इत्यादी अनेक ठिकाणाहून महिलांनी उस्फुर्त हजेरी लावून हा कार्यक्रम जबरदस्त हिट केला. मुंबई अध्यक्ष श्री.विलास त्रिंबककर, महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक, मुख्य सचिव जयवंत काळे,सचिव प्रफुल्ल खानविलकर, कार्याध्यक्ष संतोष रहाटे व त्यांची संपूर्ण टीम, महिला कार्यकर्त्या सौ. कांचन तेली, सौ. मनीषा चौधरी, सुरेखा काळे व स्थानिक महिला ह्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सर्वप्रथम ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुनिल चौधरी ह्यांनी ह्या सोहळ्याचे उद्घाटन केल्या नंतर इंटरनेशनल आर्टिस्ट किरण खोत ह्यांनी ह्या कार्यक्रमाची संपूर्ण धूरा एकट्याने वाहिली आणि ह्या कार्यक्रमाचे खरे हिरो श्री. प्रविण रहाटे. पैठणी, तन्मनी, मॅक प बॉक्स इतर गिफ्ट ची लयलूट करीत महिलांच्या हास्य कल्लोळात नाश्ता आणि रात्री जेवण करता रात्रीचे १० कधी वाजले हे कळलेच नाही. जिल्हाध्य्क्ष श्री. महेन्द्र खानविलकर ह्यांनी अप्रतिम बॅनर्स बनवून खेळात पैठणी ही जिंकली. संपूर्ण मुंबईहून व ठाणे, पालघर,बदलापूर,पनवेल ई. ठिकाणाहून आलेल्या सर्व महिला व त्यांचे पती ह्यांचे मनापासून आभार कार्यक्रमाच्या शेवटी मानण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade