राज्य शासनाच्या अख्यातरीत येणाऱ्या सर्वच शासकीय कायालयात श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक निघाले. त्याअनुशंगाने सर्व शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीचा कार्यक्रम व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, महिला आघाडीन पुढाकार घेतला आहे. श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक आणि प्रतिमा भेट देण्याचे कार्य समाजाने हाती घेतले आहे. अलीकडेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शासनाचे परिपत्रक व प्रतिमा भेट देण्यात आली. संत जगनाडे महाराज यांची जयंती सर्वच कार्यालयांत साजरी करण्यात यावी, असे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले. त्यानुसा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, महिला आघाडीने विविध कार्यालयांना भेट देऊन शासकीय परिपत्रकाची प्रत व निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेविका छबुताई वैरागडे, जितेंद्र इटनकर, शैलेश जुमडे, खेमराज हिवसे, कविता जुमडे, पूजा पडोळे, वंदना येरणे, सुवर्णा लोखंडे, वैशाली कामडे, गोलू तेलमासरे, दिनेश जुमडे, संगीता कुर्जेकर, नगरसेविका कल्पना बाबुलकर, उज्ज्वला येरणे, रवी लोणकर, चन्ने, माधुरी बावणे यांची उपस्थिती होती.