महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पालघर नगराध्यक्षा सौ. उज्वलाताई केदार काळे, केदार काळेसाहेब शिवसेना समन्वयक पालघर, सौ. पुष्पाताई बोरसे (ठाणे विभागीय महीला अध्यक्ष), श्रीमती ताराबाई चौधरी (कार्याध्याक्षा), सौ. सिमाताई चौधरी (ठाणे ग्रामीण अध्यक्ष), श्रीमती सौदामिनी रहाटे (मिराभाईदर महानगर अध्यक्ष), सौ. सिमाताई ढवळे (उपसचिव ठाणे महानगर), श्रीमती सुशिला गुप्ता अध्यक्ष (साहु तेली ठाणे) सौ. जयश्रीताई घोगंते (ठाणे महानगर उपाध्यक्षा), पांडुरंग नामदे गुरूजी (प्रसिध्दि प्रमुख/सचिव), भगवान बोरसे (जिल्हाध्यक्ष), मुकेश बोंद्रे, नरसिंग राठोड व वाडा तालुका साहु तेली पदाधिकारी, विनोद चौधरी (डहाणु अध्यक्ष) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. वसंतराव चौधरी (पालघर तालुकाध्यक्ष) यांनी केली, तसेच उपस्थितीना संताजी महारांजाची ओळख श्री. शशिकांत चौधरी (पालघर कार्यध्यक्ष) यांनी कथन केली सदर कार्यक्रमात खेळ पैठणीचा हा लकी draw चा कार्यक्रम सौ. उज्वलाताई काळे, सौ. पुष्पाताई बोरसे,सौ. सिमाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. महिलासाठी हळदिकुंकु देण्यात आला. भोजनाची उत्तम सुविधा श्री. माणिक कर्डीले साहेब यांच्या सहकार्याने उत्कृष्टरीत्या पार पडली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व खेळांचे आयोजन करण्यात आले ज्यात लहान मुलांना, महीलांना रोख बक्षीसे देण्यात आली. शेकडो समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. प्रा. तेजस नरहर चौधरी (सचिव संताजी युवा मंच पालघर) यांनी केले. छायाचित्रण सहा. प्रा.हर्षल चौधरी व तेजस प्रकाश चौधरी यांनी केले.
सदर कार्यक्रमास श्री शशिकांत चौधरी पालघर जिल्हा कार्यध्यक्ष, श्री प्रा. वसंतराव चौधरी पालघर तालुकाध्यक्ष, प्रा. तेजस नरहर चौधरी.संतोष गव्हाडे. माणिक कर्डीले, प्रकाश चौधरी, उदय चौधरी सौ ज्योतीताई चौधरी सौ सायलीताई चौधरी सौ. स्मिताताई गव्हाडे, सौ. हर्षदाताई चौधरी यांनी कार्यक्रम यशव्ही होण्यासाठी मेहनत घेतली.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade