सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची गाथा लेखक तेली समाजाचे प्रवर्तक संताजी महाराज जगनाडे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केली जाते.दि ८ डिसेंबर रोजी शासकीय पातळीवर जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होती यंदा शासनाने अध्यादेश काढून प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यलयात ही जयंती साजरी करावी असे निर्देश दिले होते.सोयगांव येथील तेली समाज बांधवांनी संताजी महाराजांचे फोटो सर्व कार्यालये, शाळा कॉलेजसना उपलब्ध करून दिले.पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी होत असल्याने तेली समाजामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.संताजी जगनाडे चौक येथे नगराध्यक्ष कैलास काळे, उपनगराध्यक्ष मंगलाबाई राऊत, नगरसेवक युवराज आगे, संतोष बोडखे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला दिवसभर विविध कार्यलयात प्रतिमा पूजन करण्यात आले संध्याकाळी श्रीराम मंदिर ते संताजी जगनाडे चौक अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेले होते.