वरवेली - गुहागर तालुक्यातील वरवेली येथे तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वरवेलीग्रामपंचायत. जिल्हा परिषद शाळा, श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच शासन आदेशानसार शासकीयनिमशासकीय कार्यलयात श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश आल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सर्व तेली समाज बंध-भगिनी बहुसंख्यने जयंती उत्सवाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सरपंच पूनम रावणंग, उपसरपंच धनश्री चांदोरकर ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर विचारे, दिव्या किर्वे, जितेंद्र विचारे, पिंटया नारकर, दशरथ किर्वे, प्रभाकर किर्वे, गणेश किर्वे, ग्रामसेविका राजेश्री शिंदे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, दिपक किर्वे, बळिराम पवार, अल्पेश किर्वे, योगेश रसाळ, प्रतिक किर्वे, शाळा नं.१ च्या मुख्याध्यापिका पल्लवी पटवर्धन उपस्थित होते. श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सरपंच पूनम रावणग व ग्रामपंचायत सदस्या दिव्या किर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.