शिंगवे - राहाता तालुक्यातील शिंगवे येथे तेली समाजाच्या वतीने शिंगवे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच हरी पगारे, उपसरपंच राजाराम काळे, माजी उपसरपंच नानासाहेब काळवाघे, तेली समाज जिल्हाध्यक्ष भागवत लुटे, जिल्हा उपाध्यक्ष विलास दुरगुडे, मुख्याध्यापक शिंंदे, ग्रा.पं. सदस्य प्रशात काळवाघे, राजेंद्र बाभुळके, विजय जंजाळ, संकेत दुरगुडे, प्रकाश गवळी, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी, असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती करण्यात यावी म्हणून शिगवे ग्रामपंचायत कार्यालयास प्रतिमा भेट देऊन निवेदन देण्यात आले. यावेळी तेली समाज बांधवांच्या वतीने विद्यार्थ्यांना खिरापत व बर्फी बाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, शासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.