चंद्रपुर मूल तेली समाज - येथील बजाज शोरूमसमोर संत संताजी. जगनाडे महाराज जयंती माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, अनिल मोगरे, दादाजी येरणे, नगरसेविका रेखा येरणे, शांताराम कामडे, डॉ. गोकुल कामडी, विजय भुरसे, विनोद आंबटकर आदी उपस्थित होते. श्री संताजी पुरूष गट मूलद्वारा आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सहसंघटक कैलास चलाख यांनी केले. कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी संताजी जगनाडे महाराज यांनी बहुजन व वंचितासाठी मोलाचे योगदान दिले. संत तुकाराम यांच्या भजनांचा प्रचार करताना संत तुकाराम यांच्या भजनांचा प्रचार करताना त्यांनी चळवळीचे कार्य केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शासनाने जयंतीचे पत्रक काढून खऱ्या अर्थाने एका समाजसुधारकाचा गौरव केल्याचे भांडेकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी आयोजकांच्या गटातील सर्व सदस्य व शेकडो परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तेली समाजाचे जिल्हा महासचिव गंगाधर कुनघाडकर तर आभार चंदन बिलवणे यांनी मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade