पुणे - आळंदी देहू व सुदूंबरे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व साठवणूक चाकणचा चक्रेश्वर व भुईकोट किल्ला ही संत तुकारामांच्या अभंग रक्षणाची एैतिहासीक ठिकाणे. भंडारा डोंगर की ज्या झाडांनी मातीने संत तुकाराम व संत संताजी ही गुरू शिष्यांची भेट व भंग न पावणारे अभंग रचले व लिहीले ती ही पावन भूमी. याच भुमीत चिखली हे एक एैतिहासिक गांव या गावात संत तुकाराम यांची किर्तन त्या काळी झाली. तुकोबाचे शिष्य श्री संत संताजी यांची ही सोबत तेव्हां होती. असा हा संस्कृतीचा ठेवा जपणारी चिखली.
या गावात तेली समजाची घरे तुकोबा कालीन त्यापैकी पिंगळे हे एक घरंदाज घराणे. घरात बैल घाना जोडीला पोटा पुरती शेती. त्यावेळचे एक सधन कुटूंब गावच्या व्यवहारात बर्यापैकी मान परंतू इंग्रजांनी चाके आणली झटपट माल बनविणार्या मशनरी आनल्या आणि तेलघाना उध्वस्त झाला. याच दरम्यान पाऊस पळून गेला. चिखलीच्या मातीतले श्री. किसनराव पिंगळे. त्यांना अनेक प्रश्नांनी पछाडले जगण्याचे साधनच उध्वस्त झाले किंवा हिरावले गेले. आशा वेळी जगने आणि जगवणे ही समस्या मोठी याच वेळी या घराची लक्ष्मी ही वाकडच्या चिंलेकरांची कन्या नाव सौ. इंदुबाई या मोठ्या जिद्दी व मोठ्या विचाराच्या थोर. घरात रांगणार्या बाल गोपाळांना मोठे करणार ही महत्वकांक्षा घरात गरिबी सुखात नांदत होती भाकरी मिरचीचा खर्डा बांधून मोल मजुरी करू लागली. दुसर्यांच्या शेतात राबू लागली. इंदुबाई या माऊलीचा एक आदर्श गरीबी आली तरी लाजू नकोस श्रींमती आली तर माजूनकोस. हा मंत्र स्वत: गिरवत व मुलांना जीवन भर गिरवण्यास लावून संसाराला हातभार लावला होता. अशा वेळी गावातील समाज बांधवानी जसा शाब्दीक तसा आर्थीक ही हातभार लावला. पोटात भूकेची आग असताना जे जे सहकार्य करतात तेच खरे देव. म्हणून माऊलीने आपल्या मुलाना समाज हीच माता हा मुल मंत्र दिला.
श्री. पोपटराव किसनराव पिंगळे हे श्री. किसनराव व कै. इंदुबाई पिंगळे यांचे चिरंजीव, चिखलीच्या शाळेत ते शिक्षण घेत होते. गावची शाळा संपली वय १० ते १२ आईची इच्छा मुलगा शिकला पाहिजे. मी काबाड कष्ट करून त्याला शिकवेल ही जिद्द. चिखली ते चिंचवड १० ते १३ मैला अंतर श्री. पोपटराव पिंगळे हे धोंड्यांचा काट्या कुटयांचा रस्ता रोज तुडवंत शिक्षण घेत होते. चिंचवडला आल्यावर विचाराला मार्ग मिळाले. घरचे संस्कार अधीकच घट्ट झाले.
यंत्राचा वावर पुण्यापासुन चिंचवड पर्यंत आला. ओसाड माळरानावर कारखाने उभे राहु लागले. माळावर माणसाळले पण आले. काम धंदा मिळु लागला. पोपटराव हे बजाज कंपनीत नोकरी करू लागले. कडुस, ता. खेड , गावात भीकूशशेठ खळदकर व कै. जनार्दन खळदकर (गुरूजी) ही समाज विचाराची मंडळी या मंडळीनी समाजाचा वसा घेऊन कार्य उभे केलेल. श्री. भीकूशेठ खळदकर यांची मुलगी सौ. रंजना ही धर्म पत्नी लाभलेली. प्राथमीक शाळेत ज्ञान दान करणारी खळदकर बंधुचा नेहमी संपर्क. त्यामुळे समाज कार्यास दिशा मिळाली.
कष्ट, धडपड व निष्ठा या बाळावर श्री. पिंगळे धडपडत होते. त्यामुळे त्यांना लक्ष्मी ही हातात होती. आर्थिक सुबत्ता नांदु लागली आईने पेन्शील देऊन गिरवायास लावले होते. गरिबी आली तरी लाजू नकोस श्रीमंती आली तरी माजू नकोस. श्री. संत संताजी यांच्या आशिर्वादाने चिखली परिसरात वावरलो. सुदूंबरे ते पंढरपूर ही संताजी पालखी सुरूवातीस सुरू होताना चिखलीस आली. तेव्हां पासुन आई कधी श्री. बाळासाहेब कधी स्वत: श्री. पोपटराव पालखी बरोबर पंढरीला जात. या वेळी अडानी पण खर्या सुशिक्षीत असलेल्या आईला एक गोष्ट पटत नव्हती. माझा संताजी ज्या पालखीतून मिरवत जातो. ती इतर संतांच्या पालखी सारखी दर्जेदर नाही. ही उनिव मुला समोर मांडली श्री. पोपटरावानी यावर स्वत: विचार केला. आणि संताजी साठी पालखी स्वखर्चाने बनवुन देतो असे सांगितले. रोख पैसे न देता अंदाजे एक लाख रूपयांची पालखी स्वत: बनवुन दिली. आईची इच्छा पूर्ण केली.
जेव्हा गरिबी होती तेव्हा बांधवांनी केलेली अमुल्य मदत त्या मुळेच जीवनाची उमेद मिळाली. त्या समाजात बाधवांत महाप्रसाद देता यावा ही १० ते १५ वर्षा पासुनची आईची इच्छा. योगा योग आसा की श्री. पोटराव उत्सव अध्यक्ष होऊन पूर्णत्वास गेली. त्यांनी समाजास अन्नदान करण्याचा आपला विचार पुर्ण केला.
समाज संघटीत असेल तर आपण टिकू शकू हा त्यांचा विचार महत्वाचा समाजातील विद्यार्थींची शक्ती शिक्षण आहे त्या साठी शक्ती महत्वाची आहे. सुदूंबरे हे एक तिर्थक्षेत्र आहे. आशा ठिकाणी मंगल कार्य धार्मीक प्रवचने किर्तन यासाठी मंगल कार्यालय असावे. या ठिकाणी शैक्षणिक, धार्मिक वारकरी पंथाचे शिक्षण मिळावे. व्यवसाय हीगरज आहे तेव्हां तेथे व्यवसाय मार्गदर्शन सल्ला केंद्र सुरू व्हावे. श्री. संताजी जीवनावर संशोधन व्हावे अधीक इतिहास मांडला जावा सुदूंबरे मंदिरात वर्षभर बांधवाचा वावर राहावा. श्री. पिंगळे हे या विचाराने शक्य ते करू पहात आहेत. या सामाजीक कार्या बरोबर ते ज्या बिजली नगर परिसरात रहात आहेत तेथे संस्कार वर्ग, अध्यात्मिक शिबीरे आयोजित करतात तेसेच स्थानीक मंडळा तर्फे गणेशउत्सवात व इतर उपक्रमात क्रियाशील असतात.
पिंपरी चिंचवड परिसरातील समाज संघटने साठी श्री. बाळासो. शेलार चिंलेकर यांच्या सह जागे राहुन संस्था कार्यरथ केली. विद्यार्थी साह्य व समारंभ तसेच वधु -वर मेळावे यशस्वी केले.