ह. भ. प. कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने, आश्रयदाते अर्जुनशेठ बरडकर या जाणत्या मंडळींनी पालखी सुरू केली. हे सर्वांना माहित आहेच परंतु या सुरूवातीच्या १ ले वर्षात जी धडपड झाली त्यावर पुढील प्रवास सुखकर झाला. यात राऊत बुवांची वणवण धडपड वृत्ती फार उपयोगी आली. दादा भगत हे एक जाणते होते. पुणे व पालखी मार्गावर नाते संबंध होते. त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यातून बरेच जन सहकार्यास समोर आले. शरद देशमाने हे पोलिस खात्यातील व चोख हिशोब ठेवणारे शासकीय अडचनी व मुक्कामाची सोय ही तेच पहात असत. दादा भगत यांचे नाते संबंध अर्जुनशेठ बरडकर यांच्याशी होते. बरडकर हे पुर्ण पालखीला बरड मुक्कामी जेवन देत होते. त्यामुळे ज्ञानेश्वर पालखीशी संबंध त्याचा फायदा दादा भगतांनी सोहळ्या साठी घेतला. सुरूवातीला जे प्रश्न उभे राहिले ते सुटले उलट त्यांनी आर्थीक मदत ही केली म्हणुन राऊत, भगत, देशमाने हे संस्थापक व बरडकर आश्रयदाते आपल्या कर्तुत्वाने झाले.
सन १९८० ते १९८३ मधील वर्तमान पत्रातील बातम्यांची कातरणे कै. दादा भगत यांचे वंशज या नात्याने आमच्याकडे इतिहास म्हणुन जपून ठेवलीत. या सुरूवातीच्या बांधवांचा त्याग सुद्धा मोलाचा आहे. सुरूवातीच्या काळात पुणे मुक्कामी पालखी आल्या नंतर. त्या पालखीला जे सामोरे गेले त्यातील कै. लक्ष्मण तु अंबिके हे होते त्यांनी भजन साहित्य व मृदूंग देणगी म्हणून दिले. नाना साहेब लांडे लोणावळा यांनी पुजा साहित्याची भांडी देणगी म्हणुन दिली. प्रमिला धोत्रे, दत्तात्रय पवार, नारायण पवार या तिघांनी स्वैयंपाक करण्यसाठी लागणारी लहान मोठी भांडी देणगी म्हणून दिली. पुणे येथिल पुरूषोत्तम व्हावळ यांनी भजना साठी २० टाळ दिले. शांताराम वसंतराव व्हावळ यांनी पखवाज ठेवण्यासाठी सुंदर आसन बनवुन दिले. हुबळी येथील विष्णूपंत फलटणकर यांच्या स्मरणार्थ अनंतराव विष्णूपंत फलटणकर यांनी बाळासोा अ. बाडकर यांच्याकडे पुर्ण स्पीकर सेट पाठवुन दिला. तो पालखी सोहळ्यास देणगी मिळाला. वाल्हे येथील पवार माळशिरस येथील राजमानेताई भोसरी गावातील गेनूजी शेलार व शेलार बंधु पुणे येथील बाळासोा गो करपे, पवार बंधू, मोहन नगर, चिंचवड, अंबिके चिखली, ता. हवेली, राधाबाई रा. जगनाडे,तळेगांव दाभाडे, सोनाबाई व्यवहारे, देहूरोड, मधुकर पवार वाल्हे, ह. भ. प. पांडूरंग बुवा कुडले कडबा व्यपारी कस्तुरे चौक पुणे आण्णासाहेब बिडवे कस्तुरे चौक पुणे, भालदार चौपदार, झेंडे वाले, तुळसवाली, टाळकरी भजनकरी प्रवचन करा हे ही महत्त्वाचे होते. शंकररराव व्यवहारे, ध्वज, रामचंद्र शेजवळ व विष्णू शेजवळ, धोंडीबा राऊत मृदंग सिदबा मारूती शेडगे, तुकाराम कोंउीबा पिंगळे वासुदेव उबाळे यांनी भालदार चौपदार म्हणत असत श्रीरंग देशमाने हे चवरीधारी असत. सौ. वनारसीबाई धोंडीबा राऊत, सौ. सिताबाई दाजी भागवत, लक्ष्मीबाई बबन वाळूंजकर, सुगंधाबाई ज्ञानोबा भागवत, सौ. अनुसयाबाई पांडुंरंग धोमकर या तुळस घेऊन पालखी सोहळ्यात पायी जात असत. श्री. दगडोबा बाळोबां बारमुख चाकण. धोंडीबा रा. राऊत इंदोरी कृष्णाजी गो. जगनाडे तळेगाव दाभाडे, हरिश्चंद्र बुवा जगनाडे हे वारकरी विणेकरी असत. रथासाठी गोटीराम बुवा कटके पाटील यांनी आपली बैल जोडी दिली होती. रथाचे सारथी म्हणून सुदूंबरे येथील बबन काळे पहात होते. आश्वधारक म्हणून संताजी बुवा रहात होते व्यवस्था पहाण्याचे काम पांडूरंग धोमकर, नामदेव मारूती उबाळे, दादा भगत पहात असत. प्रथम दोन वर्षा चांदखेड, ता. मावळ येथील बाळासाहेब रघुनाथ बारमुख यांनी आपल्या कडील पालखी संताजी पालखी सोहळ्यास दिली होती. सन १९८० साली पहिल्या प्रस्थान समयी मावळचे आमदार, सुदुंबरे येथील गाडे पाटील, फाटक तहशीलदार उपस्थीत होते. १९८१ मध्ये मा. जयवंतराव टिळक उर्जा मंत्री महाराष्ट्रराज्य यांच्या हास्ते झाले. १९८२ मध्ये माजी आमदार बाळासोा. बारमुख यांच्या शुभ हास्ते प्रस्थान झाले. यावेळी मावळचे सभापती ऍड. बाफना व डी. बी. भागवत सुदूंबरे संस्था अध्यक्ष हजर होते. ना. जी.डी. चव्हाण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र उपस्थीत होते.
शेकडो समाज बांधवांच्या त्यागातून निष्ठेतून हा सोहळा सुरू झाला आहे. त्या सोहळ्यास भगत परिवारा तर्फे अभिवादन.