शिर्डी : संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्ताने व दि. १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवसाचे औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तसेच शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांच्या हस्ते करण्यात आले.
शिर्डी शहर तेली समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स संस्थापक अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नियोजित 'संतांची थोरवी' निबंध स्पर्धा व 'विश्वकल्याण' क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व/भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर बक्षीस वितरण कार्यक्रम शिर्डी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली.प्रास्ताविक खरे यांनी केले. सर्व स्पर्धकांना सदरील स्पर्धेसाठी थोरात, भोत, श्रीमती कोठे, खरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्यावतीने रोख बक्षीस ७०१ रुपये, विद्यार्थी गुणगौरव ट्रॉफी आणि सन्मानपत्र, द्वितीय बक्षीस ५०१ रुपये, विद्यार्थी गुणगौरव ट्रॉफी आणि सन्मानपत्र, तृतीय बक्षीस ३०१ रुपये, विद्यार्थी गुणगौरव ट्रॉफी आणि सन्मानपत्र. लहान व मोठा गट असे १२ बक्षिसे विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात देऊन स्पर्धकांना गौरविण्यात आले.
असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे, नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, मुख्याध्यापक श्रीमती शैलजा वाघमारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय लुटे यांनी मानवाधिकार दिनाचे महत्त्व सांगितले. संताजी महाराज जगनाडे जयंतीनिमित्त संत कार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी थोरात यांनी आभार मानले.
यावेळी शहरातील तेली समाजाचे ज्येष्ठ विठ्ठलराव जाधव, सचिन लुटे, यशवंतराव वाघचौरे, दिलीप चौधरी, नंदकुमार व्यवहारे, विजय जंजाळ, रवि महाले, गणेश मिसाळ, गणेश वाघचौरे, धीरज व्यवहारे, राजू पाडसवान, चांगदेव कसबे, मंगेश कवडे, सुरेंद्र महाले, शशीकांत महाले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे शिर्डी शहराध्यक्ष राकेश भोकरे, शहर उपाध्यक्ष शैलेश शर्मा, शिर्डी शहर ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.