गेवराई तेली समाज :- संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या एकूण १४ टाळकांपैकी एक महत्त्वाचे टाळकरी होते. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने व निस्सीम भक्तीने संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहून ठेवण्याचे व जतन करण्याचे महान कार्य केले.संघर्षाच्या काळात संताजी जगनाडे यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांना साथ दिली.एव्हडे त्या दोघांत सख्य होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक विजय गवळी यांनी गेवराई येथे केले.
संतु तुका जोडी लावी ज्ञानाची गोडी असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज व संत संताजी जगनाडे महाराज यांच्यामध्ये असलेले सख्य स्पष्ट केले.संत तुकाराम महाराजांच्या सुखदुःखांच्या,संकटांच्या अनेक प्रसंगात संताजींनी त्यांना समर्थपणे साथ दिली.तुकारामांची गाथा लेखनाचे व ती जतन करण्याचे महान कार्य संतांजींनी केले. आपण मात्र कीर्तन - भजनात फक्त माना डोलावतो. विश्वकोष साहित्यात गेलेल्या तुकोबाच्या गाथेचे वाचन घरा-घरात व्हायला हवे,असेही विजय गवळी म्हणाले. गेवराई येथे संत संताजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त संताजी भवन येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन संताजी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने १५ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अरूणराव वाघमारे हे होते.प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध अभ्यासक विजय गवळी यांची तर भवानी बँकेच्या संचालिका सुमन भाले,माजी न.प.सदस्य चंद्रकांत शिंदे, नगरसेवक जानमोहंमद बागवान,अँड.सुभाष निकम, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, पञकार कैलास हादगुले,शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब मेधारे, श्रीकृष्ण उबाळे,रामेश्वर सोनवणे,नवनाथदेवा टोणपे आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत अशोक राऊत,शेखर बरकसे,रोहित करपे,विशाल नवपुते, गणेशटोणपे,कृष्णा बरकसे,राम बरकसे,दत्ता टोणपे, गणेश वाघमारे,प्रमोदराऊत,शुभम बरकसे,शुभम शिंदे आदींनी केले.यावेळी संत संताजी महाराज यांच्या जीवनावर पीएच.डी.करीत असलेले नेट-सेट धारक धर्मराज करपे,भवानी बँकेच्या संचालिका सुमन भाले,स्काऊटचा राज्य पुरस्कार प्राप्त वैष्णवी मनोज करपे,तैलिक महासभेच्या मराठवाडा विभागीय युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल कैलास पंढरीनाथ टोणपे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात धर्मराज करपे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला आणि महाराष्ट्र शासनाने ८ डिसेंबर रोजी संताजी महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानले. वक्ते विजय गवळी यांचा परिचय कैलास टोणपे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत राऊत यांनी तर आभार प्रा. राजेंद्र बरकसे यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णु खेत्रे,अँड.कल्याण काळे,शाहीर विलासबापू सोनवणे, माजी नगरसेवक गोरखनाथ शिंदे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष कावरे, सुनिल बोडके, प्रा. रामलिंग गुळवे, प्रकाश मुळे, अनिल राऊत, सय्यद मुदस्सीर, पत्रकार जुनेद बागवान, प्रभाकर घोडके, शिवाजीराव टोणपे, सूर्यकांत नवपुते, मनोज हजारे, कॉ. भगवानराव काळे, प्रा.गणेश सूर्यवंशी, सोमनाथ शिंदे, संतोष कोठेकर, देविदास बरकसे, रमेश वाघमारे, शिवाजीराव भाले, श्रीरंग दळवी, बद्रीनाथ करपे, नामदेव बरकसे, कैलास गवळी, चंद्रकांत नवपुते,महेश टोणपे, अशोक बरकसे, संतोष भाले, कालिदास देशमाने, आत्माराम गोरे, सचिन सरडे, सचिन शेवंते, अनिल सोनटक्के , बाळू वाघमारे, विजय वाघमारे, गणेश राऊत , सुनिल बरकसे यांच्यासह संताजी युवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.