संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई (रजि.) न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे अनमोल कार्य केलेले आपले समाज श्रध्दास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांची ओळख वारकरी संप्रदायास करून देण्यासाठी वारकऱ्याच्या स्वागतास आपण बहू संख्येने उपस्थित राहूया आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
संतु तुकयाची जीडी-लावी अभंगास गोडी
वेळ व स्थळ - रविवार दिनांक ५ जानेवारी २०२० सकाळी ९ ते १२ वाजे पर्यंत स्थळ : संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मार्केट समोर, चिंचपोकळी (पूर्व) स्टेशन जवळ, मुंबई -४०००१२. आषाडी कार्तिकेच्या एकादशी निमित्त आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊली तसेच सुदुबरेहून जगतगुरू तुकाराम महाराजाचे स्नेही व त्याचे अभंग गाथेचे लेखनिक संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजाचे पालखी प्रमाणे अखंड महाराष्ट्रातून हजारो पालख्या व त्यात सहभागी होणारे असंख्य वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाकरिता पंढरीच्या वाटेवर ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराजाच्या नाम घोपात खांद्यावर भगवी पताका घेवून टाळ मृदुगांच्या निनादात देहभान विसरून ऊन पावसात सहभागी होऊन नाचत गात पांडुरगाच्या दर्शनाच्या ओढीने हजारो वारकरी पंढरपुराच्या वाटेवर वाटचाल करताना दिसतात.परंतु मुंबई व उपनगर परिसरातील वारकरी संस्थेतील हजारो वारकऱ्याना घरातील अडी-अडचणी तसेच कामावरील रजेमुळे अशा आनंदमयी वारीत सहभागी होता येत नव्हते ही खंत वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष मा. रामेश्वर शाखी व त्याच संथेचे सचिव श्री. राजाराम निकम साहेब (नाना) आम्ही सातारकर प्रतिष्ठान यांनी बघून काही वर्षापासून पांडुरंग पालखी सोहळयाचे आयोजन नविन वर्षाच्या पहिल्या रविवारी मुंबईतील कॉटनग्रीन स्टेशन जवळील सुप्रसिध्द भव्य राममंदिर ते मुंबईतील असणारे प्रति पंढरपूर वडाळा येथील विठ्ठल मंदीरा पर्यंत वारीचा शिस्तबध्द नेत्रदीपक विठ्ठल नामाचा सोहळा वाटचाल करताना पाहून अंतकरण आनंदाने भरून येते.
अश्या या शुभ सोहळयात असंख्य वारकरी साप्रदयांना आपल्या समाजाचे श्रध्दास्थान तसेच जगतगुरू तुकारामाचे प्रिय सहकारीव त्याच्यांच अभंग गाथेचेमुळलेखनिक संतश्रेष्ठ संताजीजगनाडे महाराजयांच्या अनमोल कार्याची माहिती व्हावी अश्या या सदीच्छा.वारीत आपण सर्वजण एकजुटीने उपस्थित राहालच ही अपेक्षा.
सहयोगी श्री. मधुकर नेराळे (अध्यक्ष) श्री. मुकुंद चौधरी श्री. दयाराम हाडके श्री. विजय उबाळे श्री. तानाजी पन्हाळे श्री. देविदास राऊत श्री. हेमंत राऊत श्री. दिलीप ग. खोंड श्री. दिलीपर, खोंड श्री. राम देशमाने श्री. किशोर मेहेर श्री. सुभाष कसाबे श्री. किरण जाधव श्री. दिलीप मावळे अॅड राजेंद्र कोरडे श्री. कृष्णकांत मावळे श्री. संतोष भागवत श्री. विजय बनसोडे श्री. दत्ताजी कहाणे श्री. प्रकाश जगनाडे श्री. किशोर देशमाने ॲङ रघनाथ महाले श्री. विनायक कुवेसकर श्री. प्रकाश डिचोलकर श्री. जयप्रकाश बोरकर श्री. सुरेश धानके अनिता अनिल चौधरी नुतन तावडे
मुंबईतील सहयोगी संस्था-मंडळे व सर्व समाज बंधुभगिनी टीप : समस्त वारकरी व समाज बांधवाना अल्योउपहार, गिरणार चहा व बिसलेरी पाण्याची व्यवस्था केली आहे. सहकार्यात सहभागी व्हा. आम्ही आपले आभारी आहोत.
डेकोरेटर्स : श्री. चंद्रकांत बापटे अमृततुल्य चहा : श्री. किशोर महादेव मेहेर बिसलेरी पाणी बॉटल : श्री. राम राजाराम देशमाने श्री. कृष्णकांत शिवराम मावळे संताजीचे फोटो (लहान): श्री. दिगंबर दामोदर साखरे संताजी लेखनीक प्रतिक (पेन/पुस्तक/फोटो) श्री. दिलीप गणपत खोंड, श्री. दयाराम नारायण हाडके श्री. मोहन देशमाने (पुणे)