परिस्थितीवर मात करून नेहमी आनंदी रहावे - लक्ष्मीताई महाकाळ
औरंगाबाद, प्रतिनिधी, - जीवन जगतांना अनेक अडचणी संकटे येतात पण खचून न जाता संकटाला धैर्याने समोर जाऊन संकटांवर मात करावी. तेली समाज सेवक श्री महेंद्र महाकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलतांना त्या म्हणाल्या माणुस छोटा मोठा असे काही नसते जो तो आप आपल्या क्षमतेने परिपूर्ण असतो. तुमच्याकडे किती पैसा किती प्रॉपर्टी आहे याचे कोणाला काही देणे घेणे नसते. तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमचं काम कर्तव्य या वरच तुमचे महत्व ठरत असते.तुमचं निर्मळ मन हीच तुमची खरी श्रीमंती आहे या वरून तुम्हाला समाज लाईक करतो तुम्ही चांगले तर जग चांगलं आहे. असे मला वाटते कलियुगा मध्ये आयुष्य फक्त शंभर वर्षाचे आहे.वरचे 25 तर काढूनच टाका हो खरं जीवन हे 75 वर्षाचे आहे.त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावे व नेहमी आनंदी राहावे हीच तर जीवन जगण्याची खरी कला आहे.परिस्थिती कशीही असो खचून न जाता परिस्थितीवर मात करता आली पाहिजे.
जिंदगी से कह दो उलझे न हमसे हमे हर हाल मे जिंदगी जीने का हुनर आता है.
समाजासाठी मला जे काही करता येईल ते ते मी करीत राहिल. समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो.अशा भावना महेंद्र महाकाळ आपल्या भावना व्यक्त केल्या. तेली समाज प्रेमी,समाज सेवक,कुलदीप राऊत यांनी संत जगनाडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पुढाकार घेऊन यशस्वी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
गणेश पवार, पत्रकार, औरंगाबाद