संत तुकाराम महाराजांची गाथा लिखाणातून तारून जगासमोर आणणारे, यांचा १७ वर्षे सहवास लाभलेले आपल्या समाजाचे पण सर्वांसाठी प्रेरणा असलेले श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहची सांगता रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वा. ह.भ.प.देविदास महाराज मिसाळ यांच्या काल्याचे किर्तन व त्यांनतर संत तुकाराम महाराज व संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर ह.भ.प.विजय गवळी यांचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष नोंद प्रत्येक व्यक्तीला अखंड हरिनाम सप्ताह घेणे शक्य नाही म्हणुन जो अखंड हरिनाम सप्ताह होतो त्याची शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन होते. जो काला व त्यावर ठेवलेले नारळ प्राचीन प्रथेनुसार लोक आपल्या घरात ठेवतात, जेणेकरून आपल्या सात पिढयांचा उद्धार होतो. अशा नारळाची योग्य सप्ताह देणगी देऊन आपण मिळवु शकतात. उदया १२ वाजेनंतर १०० रू. पासून लाखो रूपयांपर्यंत हे नारळ सप्ताह देणगी लावून आपण नारळ प्राप्त करू शकतात. स्थळ राजे छत्रपती सांस्कृतिक व्यासपीठ, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी, संभाजीनगर मो.7249715525/9960715525/9850034144. तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख़्येने उपस्थित रहावे ही विनंती तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य, जय संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. (दु.१२ ते ४)