१९ जानेवारीला तेली समाज मेळावा गुणवंतांचा गौरव : सेवानिवृत्तांचा सत्कार
आरमोरी : संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने आरमोरी येथील मंगल कार्यालयात रविवार १९ जानेवारी २०२० ला तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच उपवर-वधूंचा परिचय होणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीमध्ये ७० टक्के व बारावीमध्ये ७५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या तसेच व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली नावे बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष बुधाजी किरमे, विवेक घाटुरकर, रामभाऊ कुझेकर, तुळशीराम चिलबुले यांच्याकडे ३० डिसेंबरपर्यंत नोंदवावी. तसेच समाज मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade