औरंगाबाद - जगतगुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लेखक व तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांची पुण्यथिती समाजबांधवानी घरोघरी साजरी करावी. जेणेकरून एकोपा निर्माण होऊन आपलेपणेची भावना निर्माण होईल. न्यू जयश्री अँडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक राजेंद्र होळीवाले यांच्या ठाकरे नगर N-2 सिडको येथील निवास्थानी अभिवादन सभेचे आयोजन होते. याप्रसंगी ते म्हणाले की संत जगनाडे महाराज कोण होते. त्यांचे कार्य किती महान होते याचे ज्ञान पाल्यानां होण्याकरिता तेली समाज बांधवांनी घरात संत जगनाडे महारांजांची पुण्यतिथी साजरी करायला हवी. प्रारंभी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे तेलीसेनेचे संस्थापक गणेश पवार यांच्या हस्ते पूजन झाले. राजेंद्र होळीवाले, गणेश | वाडेकरअशोक लोखंडेप्रवीण वाघलव्हाळेविनोद मिसाळ,गणेश पवार आदींची उपस्थिती होती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade