इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली. सोहळ्याचे उद्घाटक चाकणचे संजयरत्न पारखी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष संतोष माकुडे व उद्घाटक मारुती फल्ले यांच्या हस्ते केला. या प्रसंगी नूतन अध्यक्ष राऊत म्हणाले, “सोहळ्यात अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन व कीर्तन तसेच जागर सेवेबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात येईल."
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade