संताजी तेली समाज नवखळा नागभीड येथे 396 व्या संताजी जयंती महोत्सवात संजय येरणे लिखित अ वारियर्स या इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला
संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सर्वप्रथम योद्धा कादंबरी मराठीत लिहिण्याचा मान पटकावित त्याच कादंबरीचे इंग्रजी अनुवाद प्राध्यापक हरिदास फटिंग यांच्या सहकार्याने करीत वारियर्स नावाने संपूर्ण जगामध्ये संताजी चे सामाजिक, ऐतिहासिक जीवनचरित्र पेपर बॅक व ई पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कादंबरीचे प्रकाशन प्रा. देविदास चीलबुले, प्रा. डॉ. गणपत देशमुख, डॉ. श्रीकृष्ण देव्हारे, डॉ. श्वेता राखडे, नगर उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, अर्चना समर्थ, मा. दिवाकर ठाकरे तेली समाज अध्यक्ष, मा. मनिरामजी सहारे, आदी प्रमुख उपस्थितीसह कार्यक्रम अध्यक्ष नथुजी समर्थ जेष्ट्य नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
संजय येरणे यांचे आजतागायत 21पुस्तके कथा, कादंबरी, समीक्षा, कविता या प्रकारात प्रकाशन असून त्यांचे यमुना ही संशोधित कादंबरी, व विद्यार्थी करिता इंग्रजी पॅटर्न फार प्रसिद्ध आहे. तसेच योद्धा कादंबरीची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मधेही नोंद घेण्यात आली आहे. संताजीचे चरित्र सर्वप्रथम इंग्रजी कादंबरीतून उलगडून अभ्यासकांना व जगभर वाचकांना उपलब्ध झाल्याने समाज मंडळाच्या वतीने त्यांच्या सन्मानही करण्यात आला आहे