पारतंत्र्य म्हणजे गुलामगीरी ही सामाजीक, आर्थीक, सांस्कृतीक व राजकीय असु शकते. गुलामाला गुलामगीरीची जाणीव झाली की तो काय करू शकतो याचे जीवंत उदाहरण म्हणजे अस्तगांव, जि. नगर येथील स्वा. सैनिक तुकाराम हरिभाऊ गाडेकर हे होत. त्यांचे अप्रकशित आत्मपरिक्षण हस्तलिखीत स्वरूपात मिळाले ते त्यांचे चिरंजीव काशिनाथ तुकाराम गाडेकर यांनी मला प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
फक्त 4 थी शिकलेले हरिभाऊ गाडेकर गोदावरी नदी वरिल उजव्या कालव्यावर कॅनल इनस्पेक्टर म्हणुन कामाला होते. त्याच ठिकाणी 1914 मध्ये तुकाराम गाडेकर यांचा जन्म झाला. घरात तसे बरे होते. पगार ही बरा होता. परंतु त्यांना नोकरी सोडून अस्तगाव येथे यावे लागले. वडिलांनी जमिन वाटुन ताब्यात घेतली. जमिन तशी बरी पण पाऊसाच्या ठिकाण नसल्या कारणाने खोल गेलेल्या विहीरीवर मोटे द्वारे पाणी काढुन शेतीला द्यावे लागे. त्या पाण्यावर शेत पिकू लागताच हरणाचे कळप केव्हांही येत व आलेले पिक संपवुन टाकत. घरात 4 मुले व 2 मुली लहाणाच्या मोठ्या होते होत्या घराला पैशाची चण चण भासत होती. हरिभाऊनी मुले जगविण्यासाठी बैलगाडीचा व्यवसाय सुरु केला. आस्तगाव ते नगर भाडे फक्त 5 रूपये होत. ते भाडे आले की कसे तरी घर चालू शकत होते. गावातील मारवाड्याकडून घरा साठी साहित्यअणून कसे बसे घर चालत आसे पिकलेले धान्य घरात येताच मारवाडी सांगेल त्या भावात देऊन उधारी द्यावी लागे. मी तुकाराम गाडेकर शाळेत जात होतो. गावात शाळा पण ही नीट शिकता येत नव्हती. कारण घरात अठरा विश्व दारिद्र सुखात नांदत होते. म्हणुन जवळ रहाता येथे शिक्षणास गेलो. पण तेथे ही शिक्षणात अडचणीच जास्त होत्या. पुन्हा असतगावी आलो. गावात सकाळी सकाळी प्रभात फेरी निघत असे. यातमी सामील झालो. हातात तिरंगा झेंडा या झेंड्यावर चरखा आसे प्रभात फेरी हा क्रम झाला त्या वेळच्या सेवादलाचा मी एक भाग झालो या वेळी मिसरूड ही न फुटेल्या आम्हा मुलांना गुरू म्हणुन वामन गोविंद जोशी भेटले होते ते तसे भजनकरी परंतु पटांगणात आट्या पाट्या हुतूतुतु खेळताना ते आमचे झाले. त्याच बरोबर हरळुशेट मारवाडी, जोशी गंगाधर पांडूरंग तटे, बंडुशेट तरटे, साबळे, ाम माधव अत्रे भाऊ गंगाधर शेजूळ, रायभान मिस्त्री चांदभाई आसे इतर गावकरी असत प्रभात फेरी तुन आम्ही गाव जागे करित होतो.
बालपण सरत होते. गरिबीने शिक्षण दिले नव्हते घर चालले पाहिजे बांद्या मध्ये काम कर लागलो. मदन महाराज यांच्या शेतावर कामाला सुरवात केली. काही ठिकाणी महिण्यावारी काम करू लागलो. गणेश गंगाधर कुलकर्णी यांनी मोसिंबीच्या बागेत काम करू लागलो. दिवसा काम करणे ठिक पण रात्री थांबणे अवघड होते. माझ्या वयामुळे भिती वाटे. हे सुद्धा काम सुटे. घर चालले पाहिजे. या साठी पैसा पाहिजे. चांगदेव नगर येथे कराळे कडे एक मारवाडी व एका पाटलान फॅक्टरी सुर केली. त्यांच्या साठी उस लावणे किंवा तोडण ही कामे टोळी टोळीने करित होतो. यात कष्टा सारखा पैसा नाही शारिरीक हाल होत. आणि मनाला पटत नव्हते. तरी ही हे कामे फक्त चार पैसे साठवून व्यापार करू लागलो. शेंगा गोळा करणे, धान्य गोळा करणे. हा गोळा झालेला माल ठोक किंवा किरकोळीत विकणे. उसाच्या गुर्हाळावरील गुळ बाजारात विकू लागलो गावात व बाहेर गावात एक विश्वास संपादन केला.
या वेळी अस्तगावी स्वामी रामानंद भारती नेहमी येत असत. त्यांचा माझा संपर्क वाढला. त्यांना गाजराची भाजी अवडत असे. ते आले की वामन गोविंद जोशी यांच्याकडे उतरत असत. यावेळी विठ्ठल हरी सदाफळ, उमाजी गाडेकर, गोविंदराव बोटे, मारूती बाबरा, विठ्ठल पाबळे, भीकाजी गणेश वैद्य गावी येऊन सभा घेत कोपरगावात येथील शांतीलाल शहा, छगन कहार, माधवराव कोल्हाट, बापूसाहेब सीदे, विठू काळे,भावसार भोसले गावी येत आम्ही तिकडे जावुन चर्चा करित आसु. रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब गरूड, भापकर वकील, रामभाऊ भगंवता गिरमे, ल. मा. कोळसे पाटील, रहाता येथिल बारहाते पद्मश्री विठ्ठल पां. विखे यांचा सपर्क सातत्याने राहिला लोणारी मुरलीधर, भौय्या पाटील ममदापर, मस्तान पाटील हासनापूर, भाऊसाहेब थोरात जोर्वे श्रीरामपुर, बाजीराव पा. कोते, हरिभाऊ शेळके यांच्या सह काम करताना सहकार्य देताना विश्वास संपादन केला. घरात गरिबी होती. रोजच्या भाकरी साठी लढत होतो. परंतु समाज सेवेच्या फायदा घरासाठी केला नाही आम्ही 4 भाऊ यातील एक भाऊ वारला. बिगर भांडवली तेल घाना घेऊ लागला. दुसरा भाऊ शेती करू लागला. मी इतर कामे करित करीत स्वातंत्र्य संग्रमात ओढला गेलो. वयोमाना नुसार आई वडील आजारी पडले. सावकार दारात आले शेवटी कोर्टात पैसे भरून सर्वांना समान संधी दिली.
स्वातंत्र्य चळवळ नसनसात भिनली होती. इंग्रजांनी जंगले ताब्यात घेतली. आता सत्यग्रहाचे हत्यार उपसायचे ठरविले. जंगलात जाण्यास बदी होती आम्ही 200 सत्याग्रही एकत्र आलो. लव्हार कासारे येथिल जंगलात गेलो. सत्याग्रह केला सन 1930 चा तो गांधीजींचा आदेश होता. सत्याग्रह केला परंतु ब्रिटीश शासन इकडे फिरकलेच नाही. रात्री दहेगाव येथे मुककाम केला गावातल्या लोकानी भाकरी दिल्या रात्री स्वातंत्र्याची गाणी म्हणुन रात्र जागवली. स्वामी रामानंद भारती, जसराज साहु यांनी मिठाचा सत्याग्रह केला आम्हाला रहाता येथे बोलावून पोलीस अधीकार्यानी आटक केली. अटकेच्या वेळी जनसमुदाय गोळा झाला होता. काही काळाने गावो गावी याची साथ सोबत असे 1942 च्या सत्याग्रह पुकारला त्याच वेळी भाऊ वारला मला घरातुन जाऊ दिले नाही. मग बाहेर राहुन भुमीगत राहिलो. अस्तगाव संगमनेरचे दुर्वे वकील होते. त्यांच्याकडे सर्व बुलेटीन येत असत सर्व साहित्य मिळत असे सत्याग्रहात गेलेल्या मंडळींची देखभाल करू लागलो वामन जोशी, घोडेकर बंधु व अत्रे येत असत. एक दिवस बरेच जन एकत्र येऊन चितळे रोडला असलेल्या टेलीफोनच्या तारा तोडण्याचे ठरले सर्व मिळून गेलो खांबावर मी स्वत: चढलो दुर्वे वकीलांनी दिलली हात्यारे होती तारा तोडल्या खांब डळमळु लागला खाली पडण्याची भिती वाटु लागली. गडबडलो कसा तरी उतरून तारा गाळा करन विहीरीत टाकल्या. पोलीस पाटलाने माझे हुसेन भाईचे नाव रहाता पालिस स्टेशनला दिले. रोज विचारणा होती. आम्ही रेल्वे रूळ उडवण्याचे ठरविले. त्यासाठी ताकडीचे लोडेवाडी निवडली पण पोलीस पहारा होता. तिच अवस्था पुण तांबा पुलावर ही होती आता दुसरा मार्ग निवडला रहाता येथे पोष्ट ऑफिस होते. हे पोष्ट ऑफीसच आम्ही जाळुन टाकले राहाता येथे नदी काठी मिटींग झाली फुलगोठी येथे त्या दिवशी सत्याग्रह होता. तेथे पोलिस अधीकारी सत्याग्रहीना मारत असे. मिटींग मध्ये ठरले अधीकार्याला सांगु मारु नकोस न एकल्यास सामोरे जावु. यावेळी राहाता वेसीजवळ फौजदार फुलूगोठीला मारू लागला तेथे 4/5 हजार समाज पहात होता. फौजदाराला कोणच थांबवू शकत नव्हते. परंतू गाडेकर सहित 4/5 जन तेथे पोहचले. फौजदाराला सांगीतले मारू नकोस. पण तो एैकत नव्हता कारण तो एकटा नव्हता तर पोलीस बंदोबस्त होता. या बळावर तो एैकत नव्हता. समाज चिडला तसा पोलिसाच्या खांद्यावरील बंदूक हिसकावून घेतली गर्दीतुन बाहेर येत रस्त्यावरील दगडावर बंदूक फोडून टाकली लगेच त्या गर्दीत शिरुन गर्दीचा झालो. काही क्षणात एका दुकानात जावून बसलो. फार वेळा नंतर जमाव पांगला तसा मी ही त्यात सामील झालो. यानंतर वामन गोविंद जोशी, भाऊराव गंगाधर शेजूळ, तुकाराम गाडेकर, गणपत पगारे, वामन शिंपी, नाथू घोडेकर गणपत घोडेकर, सावळेराम अत्रे सतत संपर्कात राहून मिटींग घेत होते. रहाता येथे बरेच सहकारी जेल मध्ये गेले, तिच अवस्था अस्तगाव व कोपरगांव येथे झाली. सर्वावर लक्ष देण्याची जबाबदार माझ्यावर आली दुर्वे वकिल व भीकाजी वैद्य यांना अटक झाल्यावर वैद्य यांची मुले लहान होती त्यांना पैसे व धान्याची मदत केली आस्तगावी पगारे, वामन शिंपी यांना ही मदत केली.
1947 ला देश स्वातंत्र झाला. स्वातंत्र्यात वावरू लागलो काँग्रेस पक्षाचा सेवक झालो. गावात काँग्रेस भवन असावे या साठी पटवर्धन यांना भेटला त्यांनी मदत केली. आम्ही निधी उभारून एक घर घेऊन काँग्रेस भवन उभारले. काँग्रेस सभासद चार आणे होते काही फंड तालुका व जिल्हा कमीटीला द्यावा लागे. पण आज साखर सम्राट सांगतील तो सभासद तेच पैसे ही भरतात अशी स्थिती आजची आहे. स्वांतत्र्यात परिस्थीती घरची तशीच होती. सर्व पाहून आजारी पडलो. जगळेकर डॉक्टरांनी उपचार केल्या नंतर गणेश नगर साखर कारखान्यावर 20 वर्षे नोकरी केली पण सत्याचा बाणा असल्याने कारस्थानी लोकांनी अतिशय त्रास दिला यातुन तावुन सलाखून निघालो. इंग्रजांना न डगमगता उत्तर देणारा घर उपाशी राहिले तरी बाजुला झालो नाही. एका गावचा पोलिस पाटील गावाला त्रास दत असे. कुणाला जुमानत नसे. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर गेलो. त्या पोलिस पाटलाची पाटीलकी घालवली पण अतोनात त्रास झाला. आंबेकर ग्रामपंचायतीचा सेके्रेटरी हा गुंडगीरी करून त्रास देत होता. त्यांने गुंडांची फौज बाळगली होती. पण त्या सेक्रेटरीला जेल मध्ये पाठवून त्याची गुंडगीरी व त्याची गुंडाची फाोज संपवली 1950 ला काँग्रसचे सरकार होते. मी स्वराज्या साठी बाहेर राहून, अंडरग्राउंड राहून जी धडपड केली याची जाणीव काँग्रेसला होती. तेंव्हा नगरचे अध्यक्ष बार्शीकर होते त्यांनी सर्व नोंदी ठेवल्या होत्या. शरद पवार मुख्यमंत्री असताना पेन्शन मंजुर झाली. भुमीगत म्हणुन माझा नंबर 591 हेता. त्यामुळे पेन्शन व फरक ही मला मिळाला. महात्मा गांधीजींना पाहिले. जयपुर अधीवेशनास गेलो होते. पंडीत जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते. डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते. सरदार वललभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्याशी बातचीत करता आली धर्मवेड्या आर.एस.एस. संघाने गांधींना मारले यांचे दु:ख झाल मुख्यमंत्री मोरारजी भाई बरोबर माझे संबंध होते. ते मुख्यमंत्री असताना अस्तगावी आले. ते येणार म्हणताच फार जमाव गोळा झाला होता. मी ही त्यात सामील होतो. माझा मुलगा काशीनाथ तुकाराम गाडेकर माझ्या बरोबर होता. हातात सुताचा हार हेता. मोरारजी सह पंतप्रधान नेहरू होते. त्यांना माझ्या मुलाने सुताचा बनवलेला हार घातला.
काँग्रेस पक्ष जीवन प्रणाली बनलेली. त्या पक्षा साठी झटत होतो. परंतु घरची परस्थिती होती तशीच होती. लबाडी, भ्रष्टाचार माझ्या जवळ नव्हता. त्याचे वाईट ही वाटत नव्हते माझी 2 हि मुले शिकावीत मोठी व्हावीत ही धडपड होती. त्यासाठी धडपडत होतो. सायकलवर फिरत होतो. त्यांच्या शिक्षणाची सोय करू पहात होतो. मोठा काशीनाथ कसा तरी शिकला त्याला नोकरी लागली त्या वेळी घराला घर पण आले. दसरा मुलगा दशरथ चुणचुणीत होता. तो म्हणे मला इंजिनरींग करायचे आहे. परिस्थीती नसताना त्याला पुण्याला पाठविले पुण्याचा खर्च झेपत नव्हता. थोरला सहकार्य करित होता. पण खर्च झेपत नव्हता शिक्षण अर्धवट सोडता येत नव्हते प्रश्न मिटला पाहिजे एक दिवस लोणीच्या साखर कारखान्याचे चेअरमन श्री. विठ्ठल विखे पाटील आस्तगावी आले हाते. माझी चौकशी करताना विचारले मुले काय करतात. एक मुलगा पुण्याला इंजिनरींगला आहे म्हंटले. त्यांना माझ्या परस्थितीची जाणीव होती. विखे पाटलांनी प्रवरा कारखान्यावर बोलवले. मी कारखान्यावर गेलो. पाटलांनी कर्जाचा फॉर्म दिले फॉर्म भरले पण या साठी जामीनदार लागणार होते. एक जामीनदार दाढ येथिल रंगनाथ क्षिरसागर झाले. आता दुसरे कोण ? सुर्य मावळू लागला तेंव्हा निघालो बाळेश्वर येथे मी या पाटील सडकेवर उभे होते. त्यांनी चौकशी केली. तेंव्हा सांगीतले माझा मुलगा दशरथ तुकाराम गाडेकर याला शिक्षणा साठी विखे पाटलांकडे गेलो होतो. कर्जाचे फॉर्म भरलेत एक जामीन पहातोय. काहीही चौकशी न करता मिया पाटलांनी जामीनदार म्हणून सही केली. आणी 1000 रू चा चेक पुण्याला गेला. मुलगा इंजिनियर होणार याची हिंमत आली. मुलाच्या शिक्षणाला दरमहा श्री संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे येथुन ही आर्थिक मदत मिळाली शिर्डी संस्थान वरून ही मदत मिळाली. यामुळे दोन्ही मले जीवनात स्थिर झाली त्यांच्या लग्नात हुंडा घेतला नाही. 3 ही मुलींची लग्न लावुन दिली.
आज माझे वय 80 वर्षाचे आहे. मी एक स्वातंत्र सैनिक स्वातंत्र्य व पारतंत्र्य यातील फरक जगण्यातुन अनुभवलेला स्वातंत्र्यात एक तेली स्वातंत्र्यात एक गरिब म्हणुन अनेक त्रास भोगलेलाय पण जीवाची तळमळ होती प्रथम गावचा विकास व्हावा. नुसता विकास नको तर चांगले वळण असावे. दारूबंदी असावी, आकडे लावणार नसावेत. मराठी, इंग्रजी शिक्षण घेऊन मुले घडावीत या साठी गावात हायस्कल सुरू करण्यात आघाडीवर होतो. गावात गुंडगीरी भयंकर याचा त्रास झाला. त्यालाही तोंड दिले मागे सरलो नाही. मनात एकच इच्छा देश भ्रष्ट्राचार मुक्त व्हावा. दश धर्मवेड्यातुन सुटावा आणि आम्हा स्वातंत्र सैनिकांचा त्याग सार्थकी लागावा.
-भारत माता की जय -