आरमोरी - आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज भरकटला जात आहे, सोसिअल मीडियाचा अधिक वापरामुळे समाजात संबंध दुरावलेले असल्याचे दिसत आहे, यामुळे समाज संघटनवर भर दिला पाहिजेत, जग नव्या तंत्रज्ञान युगात पदार्पण केले असले या तंत्रज्ञान युगात भारतीय संस्कृतीत समाज टिकला पाहिजेत, या करिता गावो गावी समाज मेळावे घेऊन समाज संघटन केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र तेली समाज महासंघ चे अध्यक्ष बबनराव फंड यांनी केले आहे.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३१ व्या पुण्यतिथी निमित्य आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयात तेली समाज मेळावा व वर-वधू परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका छबूताई वैरागडे, आरमोरीचे पं.स. उपसभापती विनोद बावनकर, भागवन ठाकरे, म.रा. प्रांतिक तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, परसराम टिकले, डॉ.सुरेश रेवतकर, प्राचार्य पी. आर. आकरे, आरमोरी तेली समाजचे अध्यक्ष बुधाजी किरमे, डॉ. संजय सूपारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरमोरी पं.स. चे नवनियुक्त उप सभापती विनोद बावनकर, नगरसेविका छबूताई वैरागडे, भगवान ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून प्रा. गंगाधर जआरे. गोविंदराव बोडने यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कर करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठांचा, प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रस्तविकातद्वारकाप्रसाद सातपुते, संचालन प्रा. प्रदीप चापले तर आभार प्रदर्शन नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केले. यशस्वीसाठी उपाध्यक्ष रामभाऊ कुर्सेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीराम चिलबुले, विवेक घातुरकर, दीपक निंबेकार, आकाश चिलबुले, विलास चिलबुले, पंकज मोंगरकार, प्रतिभा जुआरे आदींनी सहकार्य केले..