सकारात्मक विचाराने समाजाची प्रगती साधता येते... डाँ. शाम धोपटे.
सर्वांनी आपल्या अंगी सकारात्मक विचार बाळगले व आपले मनोवांचीत धेय्य निच्छीत केले तर आपण जीवनात हमखास प्रगती करू शकतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा मोटीव्हेशानल स्पीकर डाँ शाम धोपटे यांनी ऊर्जानगरातील समाजबांधवांसमोर केले. धोपटे सर ऊर्जानगरातील आयोजित तेली समाजबांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते.
श्री संताजी स्नेही मंडळ ऊर्जानगर द्वारा दिनांक २ फेब्रूवारी २०२० ला ऊर्जानगर वसाहतीतील लहान हनुमान मंदिरात ऊर्जानगरातील समाज बांधवांचा कौटुंबिक स्नेहमीलनात कार्यक्रम संपन्न झाला.
सकारात्मक दृष्टीकोन या विषयावर डाँ शाम धोपटे चंद्रपुर यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी होते. प्रमुख अतिथी जेष्ट समाजबंधु तथा ऊर्जानगर तैलीक समाजाचे प्रवर्तक वसंत काटे, मा. देवरावजी जिभकाटे तसेच तैलीक समाज ऊर्जानगरचे अध्यक्ष प्रशांत भट, सचिव सुरेश कावळे, कोषाध्यक्ष अभिजीत वंजारी, सहसचिव अरूण रूद्रकार, महिला अध्यक्षा श्रीमती वनिता तलमले, महिला सचिव सौ. योगीता गुल्हाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने तसेच संत शिरोमणी संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूण झाली. याप्रसंगी ऊर्जानगरातील समाज बांधवांच्या पाल्यांचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्धल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच व्हाँलीबाल या क्रिडा क्षेञात भरी कामगिरी करणारे समाजबांधव अभयकुमार मस्के, गुणवत्ता मंडळाच्या क्षेञात राष्ट्रीय पातळीवर जजचे कार्य करणारे श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर वामन गोहणे, नाट्यक्षेञात कार्य करणारे तथा मराठी चिञपटासाठी निवड झालेले युवा कोषाध्यक्ष अभिजीत वंजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अभय मस्के, मुरलीधर गोहणे व अभिजीत वंजारी यांनी आपले अनुभव समाजवांधवांसमोर कथन केले. मुला-मुलींसाठी , महिला व पुरूषांसाठी विविध स्पर्धा व खेळ खेळल्या गेले यांत बक्षिस मिळविलेल्या समाजबांधवांचा सन्मान केला.
महिलांनी मकर संक्रांतीनिमित्यचा भेटवस्तु वानसर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुञसंचलन कु. बावनकर व आभार प्रदर्शन सचिव सुरेश कावळे यांनी मानले.