बाइक रॅलीने झाली कार्यक्रमाला सुरुवात - आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
देवरी 2 फेब्रुवारीला विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम संताजी मंगल कार्यालय देवरी येथे पार पडला, बाइक. रॅली काढून संपूर्ण देवरी शहरात समाजाची एकता व अखंडतेची जाणीव शहर वासीयांना झाली. बाल कलाकारांची नत्य स्पर्धा घेण्यातआली या स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या विद्याध्यांचे व गुणवंत विद्याथ्यांचे सत्कार व विशेष पुरष्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमगाव-देवरी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला लाभलेले पाहणे म्हणून लाभलेले नामदेव हटवार, सुभाष घाटे नागपूर,कमलजी हटवार गोदिया.सोमेश्वर वंजारी.व भास्कर धरमसहारे अध्यक्ष तेली समाज देवरी, सुरेश निखाडे उपाध्यक्ष, प्रभाकरजी निर्वाण, नेमिचंद आंबीलकर ,मायाताई निर्वाण, पार्वताबाई चदिवार, संजयजी मल्लेवार सर सुभद्रा ताई अगडे मंचावर उपस्थित होते त्याप्रसंगी आमदार कोरोटे यांनी तेली समाजाने : केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली व तेली समाज हा व्यवसायामध्ये, तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये तेली समाजाची चांगली पकड असल्याचे बोलले, समाजाची एकता ही नेहमी माज्या सोबतीला राहते असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ तेली समाज महासंघाच्या. देवरी येथील पदाधिकारी व युवा आघाडी अध्यक्ष घनश्याम निखाडे,सोनुभाऊ चोपकर . दिनेश भेलावे, महेंद्रजी लांजेवार, प्रमोद नीखाडे सर ,देविदास निर्माण सर, नुरहरी लांजेवार,अशोक चांदेवार सर, बापूभाऊ चदिवार ,विश्वनाथ लांजेवार,ज्योतिबा धरमशहारे, सुनील चोपकर ,सुनील थोटे. प्रमोद चोपकर, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रगतीताई प्रमोद निखाडे, इंजि. घनश्याम निखाडे यांनी केले तर प्रस्तावना एडवोकेट पुष्पकुमार गंगबोइर, स्वागत पर मार्गदर्शन राजेस चदिवार, तर आभार दीपक कापसे सर यांनी केले.