जेवणावळी, ओळखी, नाते संबंधात संपर्क, भाषण बाजी या परिघा बाहेर समाजाचे कार्यक्रम जात नाही. मानपान, प्रसिद्धीचा ढोल श्रिमंतीचे प्रदर्शन मोठे पणाची हौस मिरवणे, यातुन मतभेद ही या कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका आसा हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या शहराच्या कार्यक्रमा पर्यंत शांतता. कारण इथे मी हेच आसते. कारण इथे पळवाट ठेवुन वावरणे आसते कारण इथे खरा संघर्ष कोणाबरोबर आहे. याची साधी जाणीव ही दिलेली नसते. त्यामुळे संघर्ष होत नसतो. संघर्ष नसल्यामुळे इथे समाजाच्या आणि त्यांचया ही पदरात काहीच पडत नसते. त्यामुळे या कार्यक्रमांना वांझोटे कार्यक्रम म्हणुन सर्व बाबींनी विचार करता सत्य समोर येते. या वांझोट्या कार्यक्रमाचा समाजाला चांगलाच अनुभव आला. या मुळे समाज मन दुखवलेले गाव, शहर पातळीवरची संस्था किंवा महाराष्ट्र भर पाय पसरलेली संघटना ही फक्त पद संभाळणारे नेते व कार्यकर्ते जे आहेत ती त्यांच्या पुरती राहिली. आसे हे उने पन झाकायला नरेंद्र मोदी तेली आहेत. एक तेली देशाचे पंतप्रधान ही केवढी मोठी जमेची बाजु. हा केवढा मोठा अभिमान पोकळ आहे. या अभिमानातुन समाजाला काय मिळते हे क्षणभर बाजुला ठेवु परंतु हा वांझोटा अभिमान सांगणार्यांच्या पदरात ही तेच आहे. याची जाणीव आहे. परंतु एक वांझोट स्वप्न देऊन बढाई सांगण्यास मोदी हे एक कारण मिळाले. या पेक्षा समाजाच्या पदरात काय मिळाले हे शोधन सुद्धा सहज सोपे आहे. बाजार हाट करणारा, रोजंदारीवर काम करणारा छोटे दुकान चालवणरा रोजची भाकरी संघर्षातुन मिळवणारा समाज या वाझोंट्या अभिमाना पासुन दुर आहे. कारण काल शरद पवार किंवा गांधी कुंटूंब यांचे तुण तुणे वाजवून दमली भागलेली ही मंडळी आज नव्या जोमाने नव्या उत्साहाने नरेंद्र मोदींच्या तेली, समाजाच्या विकासाचे समाजाच्या अभिमानाचे वांझोटे स्वप्न प्रवचन स्वरुपात सांगत आहेत.