नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले. ओबीसी शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी २००२ मध्ये १७ लाख स्वाक्षयांचे निवेदन तत्कालीन शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांना सोपविण्यात आले.
या विषयाच्या जनजागृतीसाठी विदर्भात सायकल रॅलीही काढण्यात आली. संताजी जयंतीनिमित्त गोंदिया येथून २ फेब्रुवारी २००९ रोजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या पोस्ट तिकिटाचे अनावरण करण्यात आले. समाजाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सरकारने करावी आणि ओबीसींच्या पाल्यांना १०० टक्के स्कॉलरशिप मिळावी यासाठी सध्या शासनदरबारी मागणी सुरु आहे.
उद्दिष्टे समाजाचे प्रश्न शासनदरबारी संघटितपणे मांडणे - • ओबीसींचे कमी झालेले स्कॉलरशिप आरक्षण वाढविण्यासाठी लढा उभारणे • सध्या शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या २ टक्केच खर्च होतो, तो १० टक्के खर्च व्हावा यासाठी शासनस्तरावर लढा उभारणे •जातनिहाय जनगणना केली जावी, यासाठी शासनाकडे मागणी करणे. • सेमिस्टर पढ़त बंद करुन वार्षिक परीक्षा पद्धत लागू करावी
प्रमुख उपक्रम • शंभू संताजी डॉ. मेघनाद सहायक प्रबोधन मंचअंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन • अभियान व्यवस्था परिवर्तनासाठी या मासिकाचे नियमित प्रकाशन • अपंग, विधवा, विधूर, घटस्फोटितांसाठी सर्वसमावेशक सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन • शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात मार्च २०१० मध्ये नागपूर आणि अमरावती विभागीय पातळीवर मूक मोर्चा
केंद्रीय पदाधिकारी अध्यक्ष : रघुनाथ शेंडे सरचिटणीस : प्रा. डॉ. नामदेव हटवार कार्याध्यक्ष : प्रकाश देवगडे युवा अध्यक्ष : शेषराव गिहीजे कोषाध्यक्ष : धनराज तळवेकर
विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष : संजय शेंडे कार्याध्यक्ष : संजय नरखेडकर सचिव : संजय सोनटक्के उपाध्यक्ष : संजय भलमे उपाध्यक्ष : अनून हुलके कोषाध्यक्ष: धनराज तळवेकर
समाजोत्थानातून, समाजोन्नतीकडे हे आमचे धेय्य आहे. समाज अप्रगत आहे. सर्व समाजबांधवांना समान रेषेवर आणण्यासाठी संघटनेचा प्रयत्न आहे. सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासकीय स्तरावर लढा सुरु आहे. - संजय शेंडे, अध्यक्ष
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रिकरणाची गरज आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. - संजय सोनटक्के, सचिव