सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो. अशी ही भव्य कावड डोक्यावर घेऊन रामनवमीला शिखर शिंगणापूरला नेण्यासाठी निघतो. चैत्र शुद्ध एकादशीला फलटणच्या राजाकडून सन्मान होतो. द्वादशीला मुंगी - पैठण घाटाच्या पायथ्याला पुजा होते. त्याला 'धार पडते' म्हणतात. नंतर महादेवाला जाते. कावड गेल्याशिवाय अभिषेक पूर्ण होत नाही. नंतर कावड सासवडला परत येते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade