श्री देव कलेश्वर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
श्री देव कलेश्वराचा इतिहास जूना असला तरी त्याचे कागदोपत्री बऱ्याच वेळा नावे बदलली गेली असे दिसून आले येथील वेंगुर्ला गावी तेली समाजाचा विस्तार पहाता पूर्वी सगळ्यात माेठा समाज वेंगुर्ला ग्रामी होता असे असले तरी आजची वस्ती हि किरकोळ दिसून येते. पूर्वीच्या काळी आजची भूजनागवाडी येथील श्री देव कलेश्वर मंदिर हे तेली समाजाचे श्री देव कलेश्वर मंदिर म्हणून प्रसिध्द होते. वस्तूस्थिती अशी आहे की त्या मंदिराचे खरे नाव कुळकार देवस्थान म्हणूनच होते.
पूर्वी रामेश्वर कि नागेश्वर सांगता येत नाही पण जेव्हा टिपर पातळण्यासाठी तेल्याची आवश्यकता होती तेव्हा ह्या काळात तेल्यास (पोकळेगस्ती) आजचे नाव पूर्वीचे नाव तेलीगस्ती येथे जागादिली गेली होती. कागदोपत्री तसे तेली आळी म्हणून प्रसिध्द आहे ह्या वस्तीत दाजी वेंगुर्लेकर यांच्या घरी कुरण होते नंतर हेच देवस्थान साधारा १९३०-३१ च्या दरम्यान आजची भुजगनागवाडी येथे हलवण्यात आले. आता जेथेकलेश्वराचे लिंग आहे. त्याच्यापाठी पाटा ठेवण्यात आला आहे. त्या पाट्यावर त्या कुळाचेटाक होतेदेवीची मुर्ती, दत्ताची मूर्ती,आणितीनशाळीग्रामहोते. पुढे काही कालांतरानेतेल्यातीलएकानतद्रष्ट माणसानेकोणीतरी ते पळवून नेते त्याशिवाय लिंगाच्या वर नागाची मूर्ती होती ती पण चोरीस गेली.
दुसरे म्हणजे आजच्या भुजनागवाडीत पूर्वीच्या काळी एक तेल्यापैकी संत होऊन गेला. तो विठ्ठल भक्त असल्याने जे आता भूजनागवाडीतील विठ्ठल मंदिर आहे तेथे तो भजन-पूजन करत बसायचा. पुढे त्याची मूर्ती कोणी वेड्याने विहिरीत टाकली त्याची मूर्ती न मिळाल्याने ते रडत बसला नंतर तो ज्या वाण्याकडे कामाला होता (सापळे) त्यांना पंढरपुरातून विठ्ठलाची मर्ती आणून दिली ती सुध्दा असे काही जाणकार बोलतात की ही मूर्ती चंद्रभागेत जेव्हा स्नान करत असताना मिळाली म्हणून पंढरपूराच्या विठ्ठल मूर्तीवर जसे लिंग डोक्यावर आहे. तसेच वेंगुर्ल्याच्या ह्या विठ्ठलाच्यसा डोक्यावर लिंग बघावयास मिळते. पुढे सापळ्यांनी हे मंदिर बांधून दिले म्हणून त्या मंदिराचे नांव सापळ्यांचे मंदिर म्हणूनही प्रसिध्द आहे. त्याचीच आठवण म्हणून की काय विठ्ठलाचा सप्ताह संपल्यावर आजही पालखी निघाली की सावळ्याच्या घरी पाहूणचार घेतेमग पुढे निघतेहेमुद्दामलिहिण्याचे कारण हेच की ह्या विठ्ठल मंदिरात तेल्याचा मान पहिला आहे आणि दुसरी गोष्ट शी की ह्या कुळेश्वर मंदिरात आजही १) विठ्ठलाची पालखी आषाढी, कार्तिकी, सप्ताहाच्यसा सातव्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी आठवण म्हणून भेटण्यास येते. २) त्याशिवाय या मंदिरात श्रावण सोमवारी भजन होते आणि याचा उत्सव आमलकी एकादशी वसागता उत्सवाची दुसऱ्या दिवशी असते. या उत्सवात विविध ठिकाणावरुन उत्सवात तेलीयेतात असेम्हणतात की एकूण ११ तेली या गावातन इतर देवस्थानला देण्यात आले होते. ह्या सर्वांचे कुळ वेंगुर्त्यांत पूर्वी काही ठिकाणी ह्या देवस्थान कडून त्या त्या गावातील आपल्या भावकीला भेटण्याची प्रथा होती. कालांतराने तेही मोडीत निघाले. दाभोली येथे गळाकार देवस्थान चौराहा करत म्हणजे घाडी, गांवकर, राऊळ नारळ भाताचा शिडकावा कतरीत कोंबडा देण्याची प्रथा होती ती बंद झाली. त्याकाळात ह्या सर्व प्रथा चालू होत्या. बदलत्या काळानुसार ह्या सर्व प्रथा बंद झाले. हत्तीचा त्रास होऊ लागला म्हणून कौल प्रसादाने तेल रामेश्वर मंदिरात देवून येतात.