वधु वर मेळाव्यातील वाटचालीची मी चिरफाड आनेक वेळा केली आहे. ही चिरफाड चुकीची आहे. हे कोणच सांगत नाही. फक्त बघुन घेऊ आमच्या विरोधात लिहीता ही आसली दमदाटी खरे लिहीले म्हणुन होते. कारण वधू-वर मेळावा ही समाज सेवा मागेच गाडुन टाकली. भव्य दिव्य पणाच्या हौसे साठी त्याला व्यवसायीक स्वरूप दिले. समाज संस्थेला नफा ठेवता हे फक्त काही आहेत पण याच्या किती तरी पट हा एक सामुदाईक पणे समाजाला खिंडीत पकडण्याचा उद्योग झाला आहे. भरमसाठ फी, अगदी दबाव टाकून देणग्या. मोठे पणाचे गाजर दाखवून पैसे गोळा करून हे जे मेळावे भरवतात या मेळाव्या नंतर श्रमप्ररीहार नावा खाली शाकाहारी व मांसाहारी जेवण मेळाव्या नंतर आसते. काही ठिकाणी आतीश्रमा मुळे मद्यपान ही चालते. काही ठिकाणी मेळाव्याच्या पैशाने सहली ही जातात. आणि उरलेल्या पैशाचे काय झाले हे जर कोण विचारले तर त्याला दमदाटी ही आसते. आसा प्रकार मागील महिण्यात घडा ाहे. मेळाव्यातून उदयास आलेल्या नेत्याने दबाव गट निर्माण करन हिशोब न देता बोलणारी तोंडे बंद करुन याही वर्षी मेळावा कसा नफ्यात होईल याची जुळणी समोर आली. कारण ही सर्व वधु वर मेळाव्याची वाटचाल रूळली गेली आहे.