स्वातंत्र्यसैनिक कै. महादेव भिकाजी बांदेकर, भरड, पो. मालवण
६ एप्रिल १९३० रोजी मालवण काँग्रेस शिबीरामधील सहकाऱ्यासह एका हातात तिरंगाध्वज आणि दुसऱ्या हातात कु-हाड घेवून मिठाचा ढिग असलेल्या जागेवरील तारेचे कुंपण तोडून मिठाचा सत्याग्रह करीत असताना ब्रिटीश पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि बेशुध्दावस्थेतच त्यांना बेळगावच्या हिंदलगा जेलमध्ये डांबून ठेवले. रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हा असल्याने दोन महिन्यांनी त्यांना रत्नागिरी जेलमध्ये पाठविले. कोर्टाने त्याना सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली शिक्षा पूर्ण झाल्यावर पुन्हा आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील गडनदीतून दारुच्या बाटल्या घेवून जाणाऱ्या बैलगाड्या अडवून दारुचे कॅन / बाटल्या फोडून टाकल्या. सन १९४२ साली पुन्हा एकदा सत्याग्रह केल्याबद्दल ६ महिने सक्तमजूरीची शिक्षा झाली. ती शिक्षा बेळगांव किल्ला कॅम्प जेल व धारवाड येथे पूर्ण केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्यसैनिक कै. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते त्याना स्वातंत्र्यसैनिक सन्मानपत्र आणि ताम्रपट देण्यात आला.